ETV Bharat / state

वाघिणीची शिकार गुलेर घेऊन करायची नसते-पंकजा मुंडे

author img

By

Published : Mar 26, 2019, 2:53 AM IST

बीड लोकसभा मतदार संघातून भाजपच्यावतीने प्रीतम मुंडे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपच्यावतीने घेण्यात आलेल्या जाहीर सभेत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेवर निशाना साधला.

बीडमधील जाहीर सभेत पंकजा मुंडे बोलताना

बीड - या जिल्ह्यातील जनता माझ्या पाठीशी उभी आहे. मागील ५ वर्षात कोट्यावधी रुपये विकास कामासाठी खेचून आणले आहेत. १० हजार कोटीची कामे जिल्ह्यात राबवली आहेत. एवढा सगळा विकासाचा आलेख मागच्या ५ वर्षात उंचावला आहे. त्यामुळे माझ्यासारख्या वाघिणीची शिकार गुलेर घेऊन करायची नसते, असा टोला पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना लगावला. येथे आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या.

बीड लोकसभा मतदार संघातून भाजपच्यावतीने प्रीतम मुंडे यांनीसोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर भाजपच्यावतीने शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी पंकजा मुंडेसह भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मंत्री अर्जुनराव खोतकर, शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक धांडे उपस्थित होते.

बीडमधील जाहीर सभेत पंकजा मुंडे बोलताना

जर स्वतःवर एवढाच विश्वास होता तर मग राष्ट्रवादीकडून तुम्ही का लोकसभेला उभे नाही राहिलात? असा प्रश्नही पंकजांनी धनंजय मुंडेंना विचारला. बीड जिल्ह्यासाठी आम्ही सतत विकासाचे स्वप्न बघतो म्हणून जनता आमच्या पाठीशी उभी आहे. ऊसतोड कामगारांचा गोपीनाथ मुंडेच्या कन्येवर विश्वास आहे इतर कुणावर नाही, असेही त्या म्हणाल्या. तसेच भाजपची आजची जाहीर सभा पाहून विरोधकांची धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. विरोधकांना आम्ही केलेला विकास दिसत नाही असे असले तरी बीड जिल्ह्याचा विकास कोण करतंय हे जनतेला माहित आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप पक्षाचे उमेदवार प्रीमत मुंडेंच्याच पाठीशी उभे राहा असे आवाहनही त्यांनी केले.

Intro:वाघिणीची शिकार गुलेर घेऊन करायची नसते-पंकजा मुंडे

बीड- या बीड जिल्ह्यातील जनता माझ्या पाठीशी उभी आहे. मागील पाच वर्षात कोट्यावधी रुपये विकास कामासाठी खेचून आणले आहेत. दहा हजार कोटीची कामे जिल्ह्यात राबवले आहेत. केवळ ग्रामपंचायतीसाठी ५८ कोटी रुपये दिले आहेत. एवढा सगळा विकासाचा आलेख मागच्या पाच वर्षात उंचावला आहे. असे सांगत पंकजा मुंडे म्हणाल्या की, माझ्यासारख्या वाघिणीची शिकार गुलेर घेऊन करायची नसते असा टोला पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना लगावला.

Body:बीड लोकसभा मतदार संघातून भाजपकडून प्रीतम मुंडे यांची उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल केला. याप्रसंगी आयोजित जाहीर सभेत मंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मंत्री अर्जुनराव खोतकर, उमेदवार प्रीतम मुंडे, आ. सुरेश धस आ. भीमराव धोंडे आ. आर टी देशमुख, आ. लक्ष्मण पवार, आ.संगीता ठोंबरे, माजी आ.बदमराव पंडित, शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक धांडे, सचिन मुळूक यांची उपस्थिती होती. भाजपने सोमवारी उमेदवार प्रीतम मुंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून जाहीर सभा घेत आपले शक्तीप्रदर्शन केले. यावेळी पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधताना म्हटले की स्वतःवर एवढा विश्वास होता तर मग राष्ट्रवादीकडून तुम्ही का लोकसभेला उभे नाही राहिलात. एकदाच होऊन गेले असते की बीड जिल्ह्यातील जनतेचा कोणावर विश्वास आहे, हे जगजाहीर झाले असते. बीड जिल्ह्यासाठी आम्ही सतत विकासाचे स्वप्न बघतो म्हणून ही जनता आमच्या पाठीशी उभा आहे. ऊसतोड कामगारांचा गोपीनाथ मुंडे च्या कन्येवर विश्वास आहे इतर कुणावर नाही असे त्या यावेळी म्हणाल्या.

Conclusion:यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाले की, भाजपची आजची राहिली व जाहीर सभा पाहून विरोधकांची धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. मागील पाच वर्षात मंत्री म्हणून मी नेहमीच बीड जिल्ह्याच्या विकासाचा विचार केला आहे. दहा हजार कोटी रुपये ची विकास कामे बीड जिल्ह्यात केले आहेत. केवळ ग्रामपंचायतींच्या विकासासाठी 58 कोटी रुपयांचा निधी आम्ही बीड जिल्ह्यात दिला आहे. विरोधकांना आम्ही केलेला विकास दिसत नाही असे, असले तरी बीड जिल्ह्याचा विकास कोण करतंय हे जनतेला माहित आहे. असे सांगत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन पंकजा मुंडे यांनी उपस्थित जनसमुदायाला केले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.