बीड - भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी शनिवारी पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. नव्या कार्यकारिणीत मला आजच्या राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी दिली आहे. या पुढच्या काळात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सर्वतोपरी योगदान देऊ, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी निवडीनंतर दिली आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये परळी मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर माजी मंत्री पंकजा मुंडे या नाराज होत्या. आता त्यांना भाजपाने राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी दिली आहे. निवडीनंतर प्रतिक्रिया देताना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, माझ्या या निवडीमुळे माझ्या कार्यकर्त्यांना देखील आनंद झालेला आहे. कार्यकर्त्यांच्या आनंदातच माझा आनंद असून येणाऱ्या काळात पक्षाने दिलेल्या जबाबदारीनुसार पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.
दरम्यान, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शनिवारी केंद्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. त्यात राष्ट्रीय मंत्री म्हणून पंकजा मुंडे व विनोद तावडे यांचा समावेश करण्यात आला आहे. मुंडे, तावडे यांच्याशिवाय महाराष्ट्रातून विजया रहाटकर व सुनील देवधर यांनाही राष्ट्रीय सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. शिवाय अल्पसंख्याक मोर्चाच्या अध्यक्षपदी नागपूरचे जमाल सिद्धिकी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा - बिंदुसरा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी केला सत्कार
हेही वाचा - पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ कारखान्याला महाविकास आघाडी सरकारकडून १० कोटींची थकहमी