ETV Bharat / state

परळी विधानसभा : धनंजय मुंडेंकडून रोजगार निर्मिती, तर पंकजांचा सुरक्षेच्या मुद्द्यावर भर

बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा वेग वाढताना दिसत आहे. परळीतील मुंडे बंधु भगिनी यांच्यातील संघर्षात, धनंजय मुंडेंनी रोजगारनिर्मिती तर पंकजा मुंडे यांनी सुरक्षेच्या मुद्द्यावर भर दिला आहे.

परळी विधानसभा मतदारसंघ
author img

By

Published : Oct 7, 2019, 4:45 PM IST

बीड - राज्यात सध्या विविध विधानसभा मतदारसंघात प्रचाराला वेग येताना दिसत आहे. प्रमुख पक्षाचे उमेदवार पक्षाचा अजेंडा आणि स्थानिक मुद्द्यांना घेऊन मतदारांमध्ये जाताना दिसत आहेत. यामध्ये परळी विधानसभा मतदारसंघात मात्र दरवर्षीप्रमाणे चुरशीची लढत होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी शहरातील रोजगार निर्मितीचा मुद्दा पुढे आणलाय, तर भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी परळी शहराच्या सुरक्षेच्या मुद्यांवर भर दिला आहे.

हेही वाचा... नोबेल २०१९ : 'यांना' मिळाला 'शरीरविज्ञान/ वैद्यकशास्त्र' विषयातील नोबेल पुरस्कार!

बीड जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये सर्वाधिक लक्षवेधी लढत होते ती परळी मतदारसंघात. धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे अशी येथील लढत होत आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असलेले धनंजय मुंडे यांनी या ठिकाणी रोजगाराचा मुद्दा पुढे केला आहे. एका मेळाव्यात बोलताना धनंजय मुंडे यांनी, 'परळीमध्ये दोनच प्रश्न महत्वाचे आहेत. त्यात एक शेतकर्‍यांचा आणि दुसरा बेरोजगारांचा. मतदारसंघातील संपूर्ण बेरोजगारी संपवून टाकण्यासाठी दिवंगत गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी पाहिलेले एमआडीसीचे स्वप्न मी पुर्ण करणार', अशी ग्वाही दिली आहे. परळी शहरात मागील दहा वर्षात एकही नवीन उद्योग उभारलेला नाही. या उलट जे उद्योग सुरू आहेत ते बंद पडताना दिसत आहे, अशी टीका धनंजय मुंडे यांनी प्रचारा दरम्यान केली आहे.

हेही वाचा... महायुतीत रासपवर अन्याय झाला - महादेव जानकर​​​​​​​

दुसरीकडे धनंजय मुंडेच्या विरोधात त्यांची बहीण पंकजा मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात 'डोअर टू डोअर' दौरे सुरू करत प्रचाराला सुरूवात केली आहे. आपल्या प्रचारात पंकजा या प्रामुख्याने परळी तालुक्याच्या सुरक्षेचा मुद्दा मतदारांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. 'गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. त्यासाठी परळी तालुक्यातील जनतेने माझ्या पाठीशी उभे रहावे असे', असे आवाहन पंकजा मुंडे करताना पाहायला मिळत आहेत.

Intro: परळी विधानसभा: धनंजय मुंडेंनी रोजगारनिर्मिती तर पंकजा यांनी सुरक्षेच्या मुद्द्यावर दिलाय भर

बीड- विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी हळूहळू वेग घेत आहे. प्रमुख पक्षाचे उमेदवार पक्षाचा अजेंडा आणि स्थानिकच्या मुद्यांना घेऊन उमेदवार मतदारांमध्ये जात आहेत. यामध्ये परळी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी रोजगार निर्मितीवर मत मागायला सुरुवात केली आहे तर भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे या परळी शहराच्या सुरक्षेच्या मुद्यांवर भर देत आहेत. परळीच्या मुंडे बहिण-भावाच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. बीड जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये ज्या लक्षवेधी लढती होत आहेत त्यामध्ये परळी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. धनंजय मुंडे विरुद्ध बहिण पंकजा मुंडे अशी लढत होत आहे. या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अशा परिस्थितीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी रोजगारी चा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे. एका मेळाव्यात बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, परळी मध्ये दोनच प्रश्न महत्वाचे आहेत. त्यात एक शेतकर्‍यांचा आणि दुसरा बेरोजगारांचा. मतदारसंघातील संपूर्ण बेरोजगारी संपवून टाकण्यासाठी स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी पाहीलेले पंचतारांकीत एम.आय.डी.सी. चे स्वप्न मीच पुर्ण करणार असल्याची ग्वाही विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सोमवारी प्रचारा दरम्यान दिली. परळी शहरात मागील दहा वर्षात परळी शहरात एकही नवीन उधोग आणला नाही. उलट जे उधोग सुरू आहेत ते बंद पडत आहेत. अशी टीका धनंजय मुंडे हे परळीत प्रचारादरम्यान करत आहेत. दुसरीकडे बहीण पंकजा मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात 'डोअर टू डोअर' दोरे सुरू केले आहेत. ग्रामविकास खाते अंतर्गत 25- 15 चा निधी यासह परळी तालुक्याच्या सुरक्षेचा मुद्दा प्रामुख्याने मतदारांसमोर मांडण्यात चा प्रयत्न पंकजा मुंडे या प्रचारादरम्यान करत आहेत. गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. त्यासाठी परळी तालुक्यातील जनतेने माझ्या पाठीशी उभे राहावे असे, आवाहन भाजपच्या परळी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार पंकजा मुंडे करताना पाहायला मिळतात. एकंदरीत दोन्ही बहिण भाऊ आपापल्या पक्षाचा अजेंडा व स्थानिक चे प्रश्न घेऊन जनतेसमोर जात आहेत. परळी विधानसभा मतदारसंघात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचाराची रणधुमाळी दिवसेंदिवस वेग घेत आहे. याशिवाय फोडाफोडी राजकारण येत्या काळात होण्याची शक्यता आहे.Body:बीडConclusion:बीड
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.