ETV Bharat / state

कारच्या धडकेत एक जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी - किल्लेधारूर अपघात बातमी

नुकतेच तेलगाव येथे बीड परळी मार्गावर एका महिलेस ट्रकने चिरडल्याची घटना घडली होती. तर दुसरीकडे अंबेवडगाव येथे ४ मार्च रोजी पहाटे कार व ट्रॅक्टरचा अपघात होवून एक तरुण ठार झाल्याची घटना घडली होती.

अपघात कार
अपघात कार
author img

By

Published : Mar 12, 2021, 3:20 PM IST

किल्लेधारूर(बीड)- तालुक्यात अपघाताची मालिका सुरुच असून शुक्रवार (आज) पहाटे पुन्हा कार व दुचाकीत भीषण अपघात झाला. या अपघातात एका दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यु झाला. तर एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. किल्ले धारूर च्या आरणवाडी जवळील घाटात हा अपघात घडला आहे.

किल्ले धारूर घाटात राष्ट्रीय महामार्ग ५४८ सी वर शुक्रवारी (आज) सकाळी सहाच्या सुमारास कार व दुचाकीचा अपघात झाला. एम एच २० एफ पी ४१३२ ही कार औरंगाबाद येथून लातूरकडे जात असताना तेलगाव कडे जाणार्‍या दुचाकीला धडकली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. शैलेश पवार (रा.औरंगाबाद) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर जखमीला किल्ले धारूर ग्रामीण रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. यातील प्रवीण कातळेला गंभीर मार असल्याने त्याला अंबाजोगाईला हलवण्यात आले आहे.

...म्हणून घडत आहेत अपघात
नुकतेच तेलगाव येथे बीड परळी मार्गावर एका महिलेस ट्रकने चिरडल्याची घटना घडली होती. तर दुसरीकडे अंबेवडगाव येथे ४ मार्च रोजी पहाटे कार व ट्रॅक्टरचा अपघात होवून एक तरुण ठार झाल्याची घटना घडली होती. राष्ट्रीय महामार्ग ५४८ सी वर वाढती वाहतूक व घाटातील अवघड वळणे अपघाताचे कारण ठरत आहे. शिवाय घाट रुंदीकरणाचा प्रश्न अद्यापही सुटला नसल्याने घाटात तासन तास वाहतूक खोळंबत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे घाट रुंदीकरणाच्या कारणामुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

हेही वाचा- अंबानी धमकी प्रकरणी मोठी कारवाई : तिहारमधील इंडियन मुजाहिदीनच्या दहशतवाद्याकडून मोबाईल जप्त

हेही वाचा- तेलंगणातील दोघांना १२ किलो गांजासह ठाण्यात अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.