ETV Bharat / state

CORONA : बीडमध्ये जावयाच्या संपर्कात आल्याने सासऱ्याला लागण, आजूबाजूची गावे सील - कोरोना संसर्ग

आष्टी तालुक्याच्या पिंपळा येथे कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे, इतर ठिकाणी याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कलम 144 नुसार पिंपळा गावापासून तीन किलोमीटर पर्यंतचा परिसर सील करण्यात आला आहे.

'तो' जावयाच्या संपर्कात आल्याने झाला कोरोना

author img

By

Published : Apr 8, 2020, 2:51 PM IST

बीड - नगर येथे दिनांक 23 मार्च दरम्यान झालेल्या एका धार्मिक कार्यक्रमासाठी जावई नगरमध्ये आला असता त्याला भेटण्यासाठी गेलेल्या आष्टी तालुक्याच्या पिंपळा येथील 63 वर्षीय सासर्‍याला कोरोनाची लागण झाली. विशेष म्हणजे गत आठवड्यात संबंधित कोरोनाबाधित व्यक्ती हा आडमार्गाने मार्गाने नगरहून आष्टीमध्ये दाखल झाला होता. त्यामुळे, आरोग्य प्रशासन पिंपळा येथे ठाण मांडून असून आजूबाजूचे पाच ते सहा गावे सील करण्यात आली आहेत.

जिल्ह्यातील आष्टी तालुक्याच्या पिंपळा येथे कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे, इतर ठिकाणी याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कलम 144 नुसार पिंपळा गावापासून तीन किलोमीटर पर्यंतचा परिसर सील करण्यात आला आहे.

यामध्ये, सुंबेवाडी, धनगरवाडी, काकडवाडी, ढोबळ सांगवी व खरड गव्हाण हा परिसर कंटेनमेंट झोन (containment zone)म्हणून घोषित केला आहे. तर, या नंतरचा पुढील चार किलोमीटरच्या परिसरातील लोणी, नांदूर, सोलापूरवाडी, खुंटेफळ, कोयाळ ही गावे बफर झोन (buffer zone) म्हणून घोषित करण्यात येत आहेत. ही सर्व गावे व परिसर पुढील अनिश्चित काळासाठी पूर्ण वेळ बंद करण्यात येत असून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

'त्या' कुटुंबातील तिघेजण बीड जिल्हा रुग्णालयात आयसोलेट -

आष्टी तालुक्यातील त्या कोरोना बाधित रुग्णाच्या कुटुंबातील तिघाजणांना बीड जिल्हा रुग्णालयात मंगळवारी सकाळी दाखल करण्यात आले. बुधवारी रात्रीपर्यंत त्या तिघांच्या तपासणीचा रिपोर्ट मिळेल अशी माहिती बीडच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.