ETV Bharat / state

बीडमध्ये वीज अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू - वीज पडून शेतकरी मृ्त्यू परळी बीड

मांडखेल शिवारात आपल्या शेतात सुधाकर नागरगोजे हे ज्वारीची कापणी करत होते. अचानक सायंकाळी चार वाजता विजेच्या कडकडाटासह वादळी वारा व पाऊस सुरू झाला. त्याचक्षणी अंगावर वीज कोसळली. यामध्ये सुधाकर जागीच ठार झाले.

farmer died lightening parali beed
प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Mar 19, 2020, 5:09 PM IST

बीड - जिल्ह्यातील परळी तालुक्यामधील मांडखेल शिवारात बुधवारी दुपारी चार वाजता वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसादरम्यान ही घटना घडली. यामध्ये शेतकऱ्याची पत्नी गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

सुधाकर आश्रुबा नागरगोजे (वय-35), असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मांडखेल शिवारात आपल्या शेतात सुधाकर नागरगोजे हे ज्वारीची कापणी करत होते. अचानक सायंकाळी चार वाजता विजेच्या कडकडाटासह वादळी वारा व पाऊस सुरू झाला. त्याचक्षणी अंगावर वीज कोसळली. यामध्ये सुधाकर जागीच ठार झाले, तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुधाकर नागरगोजे यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी आणि पत्नी असा परिवार असून ते अल्पभूधारक शेतकरी होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.