ETV Bharat / state

निर्दयी आई! कपिलधार वाडीत उघड्यावर आढळले स्त्री जातीचे नवजात बाळ

author img

By

Published : Apr 30, 2019, 12:41 PM IST

कपिलधार वाडी शिवारात एका बाभळीच्या झाडाखाली स्त्री जातीचे नवजात अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

निर्दयी आई! कपिलधार वाडीत उघड्यावर आढळले स्त्री जातीचे नवजात बाळ

बीड - तालुक्यातील कपिलधार वाडी शिवारात एका बाभळीच्या झाडाखाली स्त्री जातीचे नवजात अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. सापडलेल्या नवजात अर्भकाची निर्दयी आई कोण? याचा तपास बीड पोलीस करत असून बाळ बीड जिल्हा रुग्णालयात सुरक्षित आहे.

बीड शहरापासून ८ किलोमीटर अंतरावर कपिलधारवाडी आहे. त्याठिकाणी सोमवारी सकाळी एका बाभळीच्या झाडाखाली बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. तेव्हा याची माहिती सकाळी शौचाला गेलेल्या लोकांनी ग्रामीण पोलिसांनी दिली. याच दरम्यान, गावातील महिलांनी त्या ठिकाणी जाऊन त्या बाळाला पाहिले.

बीड पोलीस घटनास्थळी पोहचेपर्यंत गावातील महिलांनी त्या बाळाची काळजी घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत नवजात बाळ बीड जिल्हा आरोग्य विभागाच्या स्वाधीन केले. त्या बाळाची प्रकृती उत्तम असून नवजात बाळाची आई कोण? याचा शोध पोलीस घेत आहेत.

Intro:खालील बातमीतील नवजात बाळाचा फोटो मेल केला आहे...
***********
स्त्री जातीचे नवजात बाळ सापडल्याने उडाला गोंधळ; बीड तालुक्यातील कपिलधारवाडी येथील घटना

बीड- तालुक्यातील कपिलधार वाडी शिवारात एका बाभळीच्या झाडा खाली कुपाटीच्या आळ्यात स्त्री जातीचे नवजात बाळ आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी सकाळी सात वाजता समोर आली सापडलेले स्त्री जातीच्या अर्भकाची निर्दयी आई कोण? याचा तपास बीड पोलीस करत आहेत. सापडलेले ते बाळ बीड जिल्हा रुग्णालयात सुरक्षित आहे. कपिलधार वाडी येथील महिलांनी त्या बाळाला मायेची उब दिली.

Body:बीड शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर कपिलधार वाडी आहे त्याठिकाणी सोमवारी सकाळी एका बाभळीच्या खाली तू पाटीच्या आयात नवजात बाळ रडत असल्याचे सकाळी गावातील काही लोक शौचाला गेल्यानंतर पाहिले याची माहिती तात्काळ गावातील नागरिकांना व ग्रामीण पोलीस ठाणे यांना दिली याच दरम्यान गावातील महिलांनी त्या नवजात बाळाला स्वच्छ करून मायेची ऊब दिली सध्या हे बाळ बीडच्या जिल्हा रुग्णालयात असून त्या बाळाची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमुळे आईचा निर्दयीपणा दिसून आला.

Conclusion:या घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत स्त्री जातीचे नवजात बाळ बीड जिल्हा आरोग्य विभागाच्या स्वाधीन केले आहे त्या बाळाची प्रकृती उत्तम आहे. त्या नवजात बाळाची आई कोण? हे शोधून काढण्याचे आवाहन बीड ग्रामीण पोलिसांसमोर आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.