ETV Bharat / state

नवीन नेतृत्वाची फळी महाराष्ट्रात उभी करणार - शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची आज बीडमध्ये सभा सुरू आहे.

शरद पवार
author img

By

Published : Oct 16, 2019, 4:04 PM IST

Updated : Oct 16, 2019, 6:21 PM IST

बीड - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची आज बीडमध्ये जाहीर सभा पार पडली. सत्ताधाऱ्यांवर टीका करतानाच त्यांनी राष्ट्रवादीतून पक्षांतर करणाऱ्यांचाही चांगलाच समाचार घेतला. शरद पवार म्हणाले की, १९८० साली मी बीड जिल्ह्यात निवडणुकीसाठी जे उमेदवार दिले ते सगळे निवडून आले, त्याची पुनरावृत्ती यावेळी नक्की होणार आहे. आज नवी पिढी उभारण्याची भूमिका आपण घेतली आहे. या भूमिकेला मोठा पाठिंबा बीड जिल्ह्यातून मिळतोय. परिवर्तनाच्या या लढ्यात बीडची जनता पुढाकार घेईल.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

हेही वाचा - मराठा-ब्राह्मण समाजांचे पुन्हा एकत्र येणे हा महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा क्षण

बीडमध्ये सध्या एक वेगळेच वातावरण आहे. आपण ज्यांना साथ दिली, त्यांनी भलत्याच घरी प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. असा निर्णय घेणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचा निर्णय बीडकरांनी घेतला आहे. मी गुदमरलो होतो म्हणून त्या घरी गेलो, असे सांगत इथल्या नेतृत्वाने नवा घरोबा केला. ज्यांना तीन वेळा मंत्री केलं, सत्तेची ऊब आणि शक्ती दिली ते असं वागले. मात्र, असं सारखं कुंकू बदलायचं नसतं. घरोबा एकदाच करायचा असतो आणि तिथे प्रामाणिकपणाने राहायचं असतं. दुसऱ्या घरोब्याचा शोध केला तर लोक त्याबद्दल काय बोलतात हे न बोललेलंच बरं, असा टोला पवारांनी जयदत्त क्षीरसागर यांचे नाव न घेता लगावला.

हेही वाचा - 'भाजप-सेनेचं दिवाळं काढल्याशिवाय दिवाळी साजरी करायची नाही'

बीड शहर मतदारसंघाचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांच्यामागे जनतेची ताकद उभी करून त्यांना विजयी करण्याचे आवाहन आज शरद पवार यांनी बीड येथील जाहीर सभेत केले.

Intro:Body:

pawar

Conclusion:
Last Updated : Oct 16, 2019, 6:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.