मुंबई/बीड - किरण गोसावी याचा सुरक्षारक्षक प्रभाकर साईल याने एनसीबीच्या क्रुझ कारवाईची व्हिडिओ, फोटोद्वारे पोलखोल केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी यानंतर सत्य जीतेगा, सत्यमेव जयते, असे ट्विट करत, समीर वानखेडे यांना आव्हान दिले आहे. सीडीआर तपासून एसआयटी (विशेष तपास पथक) मार्फत चौकशी करावी, अशी मुख्यमंत्र्याकडे मागणी करणार असल्याचे मलिक यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
एनसीबी विरोधात गौप्यस्फोट
क्रुझवरील ड्रग्स पार्टीवर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या टीमने छापेमारी केली. आर्यन खानसह सात जणांना ताब्यात घेतले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री मलिक यांनी हरकत घेत कारवाई बनावट असल्याचे आरोप समीर वानखेडे यांच्यावर केले होते. प्रकरणाचा तपास सुरू असतानाच वानखेडे यांना टार्गेट केल्याने मलिक यांच्यावर भाजपकडून टीकेची झोड उठली होती. प्रकरण ताजे असतानाच, आता साक्षीदार असलेल्या के.पी. गोसावी याच्या सुरक्षारक्षकानेच एनसीबीसंदर्भात गौफ्यस्फोट केले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. मलिक यांनी यावरुन समीर वानखेडे यांनी पुन्हा लक्ष केले आहे.
-
सत्य ही जीतेगा
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 24, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
सत्यमेव जयते
">सत्य ही जीतेगा
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 24, 2021
सत्यमेव जयतेसत्य ही जीतेगा
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 24, 2021
सत्यमेव जयते
ही तर संघटीत गुन्हेगारी
सुरुवातीपासून सांगत आहे बोगस केसेसे तयार केल्या जात होत्या. चित्रपटसृष्टीतील आणि श्रीमंत लोकांमध्ये भीती निर्माण करून त्यांच्या कढून पैसे उकळण्याचा हा धंदा आहे. दहशत माजवण्याचा प्रकार सुरू आहे. ही संघटीत गुन्हेगारी सुरू आहे. त्याची दखल घेऊन एसआयटीच्या माध्यमातून चौकशी सुरू करायला हवी.
सीडीआर तपासून कारवाई करा
समीर वानखेडे हे खोट्या आरोपाखाली लोकांना अडकवत आहेत. दहशत निर्माण करत आहेत. वसुली सुरू आहे हे मी आधीपासूनच सांगत आहे. आता त्यांचाच पंच समोर आला असून त्यानेच गौप्यस्फोट केले आहेत. शहरात एकप्रकारे संघटीत गुन्हेगारी सुरू आहे. हजारो कोटी रुपये या लोकांनी वसूल केले आहेत. कुठे तरी या घटनेचा सीडीआर घेऊन एसआयटीमार्फत याची चौकशी करायला हवी. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि पोलीस आयुक्तांना भेटून यासंदर्भात तक्रार करणार असल्याचे मलिक यांनी सांगितले. तसेच ट्विटरवरुन सत्य जीतेगा, सत्यमेव जयते असे ट्विट केले आहे. एनसीबीकडून अद्याप याबाबत खुलासा झालेला नाही.
हेही वाचा - Aryan Khan Case -आर्यनच्या सुटकेसाठी 25 कोटींचा सौदा, ड्रग्ज पार्टी प्रकरणातील 'पंच'चा गौप्यस्फोट