ETV Bharat / state

केज विधानसभा : राष्ट्रवादीकडून पृथ्वीराज साठे तर भाजपकडून नमिता मुंदडा यांनी भरला उमेदवारी अर्ज - BJP Maharashtra

राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारून भाजपच्या तंबूत दाखल झालेले मुंदडा कुटुंबीय केज विधानसभा मतदारसंघातुन विधानसभा निवडणुक लढवत असल्याने त्यांची चर्चा राज्यभर होत आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

केज विधानसभा : राष्ट्रवादी कडून पृथ्वीराज साठे तर भाजपकडून नमिता मुंदडा यांनी भरला उमेदवारी अर्ज
author img

By

Published : Oct 5, 2019, 2:53 AM IST

बीड - संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या केज विधानसभा मतदार संघात मागील 8 दिवसात मोठ्या घडामोडी घडल्या. यात पृथ्वीराज साठेंना राष्ट्रवादीकडून ऐनवेळी उमेदवारी जाहीर झाली. साठे यांनी शक्तिप्रदर्शन करत गुरुवारी अर्ज दाखल केला, तर नमिता मुंदडा यांनी शुक्रवारी पावसामुळे शक्ती प्रदर्शन न करताच उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपच्या खासदार प्रितम मुंडे यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे नमिता मुंदडा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना संगीता ठोंबरेंच्या उपस्थितीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.

हेही वाचा - एक मिनिट उशीर झाल्याने 'या' उमेदवाराचा नाकारला अर्ज

राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारून भाजपच्या तंबूत दाखल झालेले मुंदडा कुटुंबीय केज विधानसभा मतदारसंघातुन विधानसभा निवडणुक लढवत असल्याने त्यांची चर्चा राज्यभर होत आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी भाजपच्या नमिता मुंदडा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. पावसामुळे नमिता मुंदडा यांना शुक्रवारी शक्तिप्रदर्शन करता आले नाही. त्यांनी शक्तिप्रदर्शन न करताच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गुरुवारी पृथ्वीराज साठे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज केला.

हेही वाचा - आबांच्या पश्चात विधानसभेची निवडणूक खडतर नाही, पण सोपीही नाही - रोहित पाटील

भाजप-राष्ट्रवादीसाठी येथील लढत प्रतिष्ठेची -

राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी डावलुन नमिता मुंदडा यांनी भाजपकडून उमेदवारी घेतली. स्वतः शरद पवार यांनी उमेदवारी जाहीर करूनही मुंदडा कुटुंबीयांनी दगा दिल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये आहे. याचा वचपा काढण्यासाठी केज विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. तर भाजप नमिता मुंदडा यांच्या विजयासाठी रणनीती आखत आहे. केज विधानसभा मतदारसंघाची लढत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप साठी प्रतिष्ठेची बनली आहे. या मतदारसंघात विद्यमान आमदार संगीता ठोंबरे यांना उमेदवारी मिळाली नसली तरीही त्या भाजप बरोबर आहेत. केजची जागा राष्ट्रवादी काँग्रेस जिंकणार की, भाजप पुन्हा एकदा केज विधानसभा मतदार संघावर वर्चस्व प्रस्थापित करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Intro:केज विधानसभा: राष्ट्रवादी कडून पृथ्वीराज साठे तर भाजपकडून नमिता मुंदडा यांनी भरला उमेदवारी अर्ज

बीड- संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या केज विधानसभा मतदार संघात मागील 8 दिवसात मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. राष्ट्रवादीकडून पृथ्वीराज साठे यांना अचानक उमेदवारी जाहीर झाली. साठे यांनी शक्तिप्रदर्शन करत गुरुवारी अर्ज दाखल केला होता. तर नमिता मुंदडा यांनी शुक्रवारी पावसामुळे शक्ती प्रदर्शन न करताच उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजप च्या खा. प्रितम मुंडे यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे नमिता मुंदडा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना कीचा आमदार संगीता ठोंबरे यादेखील उपस्थित होत्या. याची मोठी चर्चा राजकीय वर्तुळात झाली.

राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारून भाजपच्या तंबूत दाखल झालेले मुंदडा कुटुंबीय केज विधानसभा मतदारसंघातुन विधानसभा निवडणूक लढवत असल्याने त्यांची चर्चा राज्यभर होत आहे. विशेषता या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी भाजपच्या नमिता मुंदडा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पावसामुळे नमिता मुंदडा यांना शुक्रवारी शक्तिप्रदर्शन करता आले नाही. त्यांनी शक्तिप्रदर्शन न करताच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गुरुवारी पृथ्वीराज साठे यांनी शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज केला आहे.

भाजप-राष्ट्रवादीसाठी येथील लढत प्रतिष्ठेचे-

राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी डावलुन नमिता मुंदडा यांनी भाजप कडून उमेदवारी घेतली. स्वतः शरद पवार यांनी उमेदवारी जाहीर करूनही मुंदडा कुटुंबीयांनी दगा दिला ही भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये आहे. याचा वचपा काढण्यासाठी केज विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. तर भाजप नमिता मुंदडा यांच्या विजयासाठी रणनीती आखत आहे. केज विधानसभा मतदार संघाची लढत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप साठी प्रतिष्ठेची बनली आहे. या मतदारसंघात विद्यमान आ. संगीता ठोंबरे या देखील उमेदवारी मिळाली नसली तरीही भाजप बरोबर आहेत. केज ची जागा राष्ट्रवादी काँग्रेस जिंकणार की, भाजप पुन्हा एकदा केज विधानसभा मतदार संघावर वर्चस्व प्रस्थापित करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.