ETV Bharat / state

बीड : करणी केल्याच्या संशयातून ६ वर्षीय बालकाचा खून; आरोपींना अटक

नेकनूरपासून जवळ असलेल्या रत्नागिरी येथे बुधवारी जिल्हा परिषद शाळेच्या आवारात ६ वर्षीय बालकाचा मृतदेह आढळून आला होता. या बालकाचा खून करणीच्या संशयातून झाला असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे.

murder-of-six-year-old-boy-in-superstition-accused-arrested-in-beed
बीड : करणी केल्याच्या संशयातून ६ वर्षीय बालकाचा खून; आरोपींना अटक
author img

By

Published : Feb 4, 2021, 7:51 PM IST

बीड - तालुक्यातील नेकनूर जवळील रत्नागिरी गावातील एका ६ वर्षीय बालकाचा बुधवारी मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी कुटुंबियांनी घातपाताचा आरोप केला होता. नेकनूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपासगतीने करत या प्रकरणाचा उलगडा केला असून याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. करणीच्या संशयातून त्या बालकाचा खून झाला असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे.

जिल्हा परिषद शाळेच्या आवारात आढळून आला होता मृतदेह -

नेकनूरपासून जवळ असलेल्या रत्नागिरी येथील शुभम (उर्फ राज) सपकाळ या ६ वर्षीय बालकाचा मृतदेह बुधवारी जिल्हा परिषद शाळेच्या आवारात आढळून आल्याने खळबळ उडाली. शुभमच्या कुटुंबियांनी या प्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त केला होता. बुधवारी रात्री उशिरा अहवालातून त्या बालकाचा गळा आवळून खून करण्यात आला असल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी सपकाळ यांच्या नात्यातील रोहिदास नवनाथ सपकाळ व देवईबाई रोहिदास सपकाळ या दाम्पत्याला ताब्यात घेतले होत. यावेळी या दोघांनीही जुन्या भांडणातून त्या बालकाचा खून केला असल्याचे सांगितले.

यामुळे रोहितचा खून -

आमच्या म्हैशीला करणी करून तिला ठार मारण्यात आले होते आणि त्याचा बदला म्हणून आम्ही त्यांच्या मुलाला ठार मारले, असे आरोपींनी पोलिसांना सांगितले. रोहिदास सपकाळ यांचे घर जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे असून बुधवारी शुभम शाळेला आला असता त्याला उचलून रोहिदास यांनी स्वत:च्या घरामध्ये नेले आणि तिथेच त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह जिल्हा परिषद शाळेच्या आवारात आणून टाकला असल्याची कबुली पोलिसांना दिली.

हेही वाचा - आंदोलक शेतकऱ्यांच्या भेटीला विरोधीपक्षाचे नेते गाझीपूर सीमेवर; सुप्रिया सुळे म्हणतात....

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.