ETV Bharat / state

चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा व 2 मुलांचा खून; पोलीस तपासात झाले निष्पन्न - murder news today

संतोष कोकणे हा आपल्या पत्नी च्या चारित्र्यावर संशय घेत होता. एवढेच नाही तर 17 मे रोजी आरोपी संतोष याने पेठ बीड पोलीस ठाण्यात पत्नी गायब झाल्या बाबतची तक्रार देखील दिली होती. त्यानुसार पोलिसांनी संबंधित प्रकरण हाताळले होते. अखेर संतोष याने रविवारी पहाटे चारच्या दरम्यान पत्नी व दोन मुलांना झोपेतच मारून टाकले. पत्नीच्या डोक्यात बॅट घालून मारत असताना अचानक दोन नंबरचा मुलगा कल्पेश जागा झाला. पत्नीच्या डोक्यात बॅट घालताना मुलाने पाहिले म्हणून कल्पेशच्या देखील डोक्यात बॅटने वार करत त्याला जागीच ठार केले.

Murder of a mother with two children in Beed
तिहेरी हत्याकांड; बीडमध्ये दोन मुलांसह आईचा खून
author img

By

Published : May 24, 2020, 4:41 PM IST

Updated : May 25, 2020, 10:25 AM IST

बीड - शहरातील शुक्रवार पेठमध्ये तकवा भागात चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा व दोन मुलाचा मुलांचा खून केला. या घटनेत सर्वात मोठा मुलगा आत्याकडे गेलेला असल्याने त्याचा जीव वाचला. संतोष कोकणे असे आरोपीचे नाव आहे. तर पत्नी संगीता संतोष कोकणे ( वय - 31), मुले कल्पेश कोकणे (वय 10), सिद्धेश कोकणे (वय -8, सर्व रा. बीड) असे खून झालेल्या तिघा मायलेकरांची नावे आहेत. या घटनेमुळे बीड शहर परिसरात खळबळ उडाली आहे.

चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा व 2 मुलांचा खून

पोलिसांनी केलेल्या तपासात पतीनेच पत्नीचा आणि दोन मुलांचा खून करून संबंधित पोलिस स्टेशन गाठले आणि पत्नी गायब झाली असल्याची तक्रार दिली. काहीच वेळात आरोपीच्या पत्नीचा आणि दोन मुलांचा मृतदेह घरात आढळून आला. प्रकरणानंतर आरोपी ताब्यात घेऊन चौकशी करेपर्यंत पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे उपविभागीय पोलिस अधिकारी सावंत हे पेठ बीड पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते.

आरोपी संतोष कोकणे हा आपल्या पत्नी च्या चारित्र्यावर संशय घेत होता. एवढेच नाही तर 17 मे रोजी आरोपी संतोष याने पेठ बीड पोलीस ठाण्यात पत्नी गायब झाल्या बाबतची तक्रार देखील दिली होती. त्यानुसार पोलिसांनी संबंधित प्रकरण हाताळले होते. अखेर संतोष याने रविवारी पहाटे चारच्या दरम्यान पत्नी व दोन मुलांना झोपेतच मारून टाकले. पत्नीच्या डोक्यात बॅट घालून मारत असताना अचानक दोन नंबरचा मुलगा कल्पेश जागा झाला. पत्नीच्या डोक्यात बॅट घालताना मुलाने पाहिले म्हणून कल्पेशच्या देखील डोक्यात बॅटने वार करत त्याला जागीच ठार केले. शेवटी सिद्धेश याचे हात-पाय बांधून पाण्याच्या टाकीत टाकून दिले. त्यामुळे सिद्धेश पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याचे पोलिस अधीक्षक यांनी सांगितले.

याप्रकरणी आरोपी संतोष कोकणे याच्याविरुद्ध पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. काही तासातच आरोपी संतोष कोकणे याने पोलिसांची जवळ गुन्हा कबुल केला आहे. तर पुढील तपास सुरू आहे.

Last Updated : May 25, 2020, 10:25 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.