ETV Bharat / state

मुक्ताईने घेतली आजोबा गोविंदपंत यांची भेट; आजोबा-नातीच्या भेटीचा सोहळा वारकऱ्यांनी डोळ्यात साठवला - भेट

बिंदुसरा नदीच्या पुलाजवळील मुक्ताईचे आजोबा गोविंदपंत यांच्या समाधीस्थळी सकाळी साडेसहा वाजता मुक्ताई आणि आजोबा गोविंदपंत यांची भेट झाली. नातीच्या पादुका आजोबांच्या समाधीस्थळी नेण्यात आल्या. तेव्हा वारकऱ्यांनी आदिशक्ती मुक्ताबाई असा जयघोष केला.

मुक्ताईने घेतली आजोबा गोविंदपंत यांची भेट
author img

By

Published : Jul 1, 2019, 6:41 PM IST

बीड - शहरातील बालाजी मंदिरात रविवारी रात्री मुक्कामी असलेल्या संत मुक्ताईच्या पालखीचे सोमवारी सकाळी सहा वाजता पाली गावाकडे प्रस्थान झाले. वाटेत बिंदुसरा नदीच्या पुलाजवळील मुक्ताईचे आजोबा गोविंदपंत यांच्या समाधीस्थळी सकाळी साडेसहा वाजता मुक्ताई आणि आजोबा गोविंदपंत यांची भेट झाली. नातीच्या पादुका आजोबांच्या समाधीस्थळी नेण्यात आल्या. तेव्हा वारकऱ्यांनी आदिशक्ती मुक्ताबाई असा जयघोष केला. या भेटीने तृप्त होत जड अंतकरणाने बीडकरांनी पालखीला पंढरपूरकडे मार्गस्थ केले.

मुक्ताईने घेतली आजोबा गोविंदपंत यांची भेट

मागील ३१० वर्षापासून जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून मुक्ताबाईची पालखी पंढरपूरला जाते. बीड शहरात या पालखीचा दोन दिवस मुक्काम असतो. बीडकरांच्या सेवेने भारावलेल्या वारकऱ्यांनी पालीकडे प्रस्थान ठेवले. सोमवारी सकाळी साडेसहा वाजता मुक्ताईची पालखी गोविंदपंत यांच्या समाधीस्थळी आली. तेव्हा वारकऱ्यांनी पालखीतील मुक्ताईच्या पादुका डोक्यावर घेत त्या आजोबांच्या समाधीस्थळी नेल्या. समाधीस्थळी गोविंदपंत व मुक्ताई यांच्या पादुकांचे एकत्रित पूजन करण्यात आल्यानंतर आजोबा गोविंदपंत यांच्या पालखी सोहळ्याच्यावतीने साडीचोळी भेट देऊन मुक्ताईची बोळवण करण्यात आली. तेव्हा वारकऱ्यांनी आदिशक्ती मुक्ताबाई, संत ज्ञानेश्वर महाराज व गोविंदपंत यांच्या नावाचा जयघोष केला. दोन्ही पादुकांची महाआरती करण्यात आल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. आजोबा व नातीच्या या भेटीचा अनुपम्य सोहळा वारकऱ्यांनी डोळ्यात साठवला. यावेळी मुक्ताई संस्थान पालखी प्रमुख रविंद्र महाराज हरणे यांचा गोविंदपंत पालखी सोहळ्याच्यावतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर मुक्ताईच्या पालखीने पालीकडे प्रस्थान ठेवले. सोमवारी या पालखीचा पाली गावात मुक्काम असून मंगळवारी सकाळी पालखी मांजरसुंबा घाट वढणार आहे.

काय आहे मुक्ताई व बीडचे वेगळे नाते-

मुक्ताईचे पंजोबा त्रिंबकपंत हे वीर पुरुष होते. यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव म्हणजे मुक्ताईचे आजोबा गोविंदपंत यांनी देवगिरी राजाचे सेनापती म्हणून काम पाहिले होते. पुढे बिंदुसरा नदीच्या तीरावर येथेच गोविंदपंत यांनी समाधी घेतली. पैठण तालुक्यातील आपेगाव हे संत ज्ञानेश्वरांचे जन्मगाव आणि पूर्वजांचे मूळस्थान आहे. त्रिंबकपंत यांना हरिपंत आणि गोविंदपंत अशी दोन मुले होती. बीडमध्ये गोविंदपंत यांना पत्नी रमाबाई यांच्यापासून एक पुत्र झाला. त्यांचे नाव विठ्ठलपंत, हेच संत ज्ञानेश्वरांचे वडील होय. पुढे विठ्ठलपंत हे आळंदी येथे स्थायिक झाले. तेथे त्यांना निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी चार अपत्ये झाली. पुढे गोविंदपंत यांनी बीड शहरातील बिंदुसरा नदीच्या काठावर समाधी घेतली. त्यांचे वंशज बीड येथील दत्त मंदिर गल्ली येथील विठ्ठल मंदिरात पुजारी असून त्यांचे आडनाव रामदासी आहे. पेशव्यांच्या काळात पूर्वी गोविंदपंत यांच्या समाधीचा जिर्णोद्धार झाला होता.

कसा झाला समाधीचा जीर्णोद्धार-

बिंदुसरा नदीच्या काठावरील ही समाधी दुर्लक्षित होती. दिवंगत इतिहास अभ्यासक शक्तिकुमार केंडे, तसेच डॉक्टर सतीश साळुंखे, पत्रकार जगदीश पिंगळे आणि दिनेश लिंबेकर यांनी ही समाधी उजेडात आणली. पुढे समाधीच्या जीर्णोद्धाराचे काम नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या पुढाकारातून झाले. आळंदी येथील डॉ. किसन महाराज साखरे व मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या उपस्थितीत ११ लाख रुपये खर्चून समाधीचा जीर्णोद्धार झाला. बीड येथील श्री. ज्ञानेश्वरी सत्संग मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मागील अनेक वर्षांत केलेल्या संशोधनानंतर समाधीचा जिर्णोद्धार झाला.

Intro:

बाईट- रविंद्र महाराज हरणे

आजोबा नातीच्या भेटीचा सोहळा वारकऱ्यांनी डोळ्यात साठवला ...

मुक्ताई ने घेतली आजोबा गोविंद पंत यांची भेट

बीड- शहरातील बालाजी मंदिरात रविवारी रात्री मुक्कामी असलेल्या संत मुक्ताईच्या पालखीचे सोमवारी सकाळी सहा वाजता पाली गावाकडे प्रस्थान झाले. वाटेत बिंदुसरा नदीच्या पुलाजवळील मुक्ताई चे आजोबा गोविंदपंत यांच्या समाधीस्थळी सकाळी साडेसहा वाजता. मुक्ताई आणि आजोबा गोविंदपंत यांची भेट झाली. नातीच्या पादुका आजोबांच्या समाधीस्थळी नेण्यात आली. तेव्हा वारकऱ्यांनी आदिशक्ती मुक्ताबाई असा जयघोष केला. या भेटीने तृप्त होत जड अंतकरणाने बीडकरांनी पालखीला निरोप दिला.

मागील ३१० वर्षापासून जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून मुक्ताबाईची पालखी पंढरपूरला जाते .बीड शहरात या पालखीचा दोन दिवस मुक्काम असतो. बीड करांच्या सेवेने भारावलेल्या वारकऱ्यांनी आज पाली कडे प्रस्थान ठेवले. सोमवारी सकाळी साडेसहा वाजता मुक्ताईची पालखी गोविंदपंत यांच्या समाधीस्थळी आली. तेव्हा वारकऱ्यांनी पालखीतील मुक्ताईच्या पादुका डोक्यावर घेत त्या आजोबांच्या समाधी स्थळी नेल्या. समाधीस्थळी गोविंदपंत व मुक्ताई यांच्या पादुकांचे एकत्रित पूजन करण्यात आल्यानंतर आजोबा गोविंद पंत यांच्या पालखी सोहळ्याच्या वतीने साडीचोळी भेट देऊन मुक्ताईची बोळवण करण्यात आली. तेव्हा वारकऱ्यांनी आदिशक्ती मुक्ताबाई, संत ज्ञानेश्वर महाराज व गोविंदपंत यांच्या नावाचा जयघोष केला. दोन्ही पादुकांची महाआरती करण्यात आल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आजोबांना तिच्या या भेटीचा अनुपम्य सोहळा वारकऱ्यांनी डोळ्यात साठवला. यावेळी मुक्ताई संस्थान पालखी प्रमुख रविंद्र महाराज हरणे यांचा गोविंदपंत पालखी सोहळ्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर मुक्ताई चे पालखीने पालीकडे प्रस्थान ठेवले आज सोमवारी या पालखीचा पाली गावात मुक्काम असून मंगळवारी सकाळी पालखी मांजरसुंबा घाट वढणार
आहे.

काय आहे मुक्ताई व बीडचे वेगळे नाते-

मुक्ताई चे पंजोबा त्रिंबकपंत हे वीर पुरुष होते. यांच्या नंतर त्यांचे चिरंजीव म्हणजे मुक्ताई चे आजोबा गोविंदपंत यांनी देवगिरी राजाचे सेनापती म्हणून काम पाहिले होते. पुढे बिंदुसरा नदीच्या तीरावर येथेच गोविंदपंत यांनी समाधी घेतली. पैठण तालुक्यातील आपेगाव हे संत ज्ञानेश्वरांचे जन्मगाव आणि पूर्वजांचे मूळ स्थान होय. मुक्ताई चे पणजोबा हरिपंत कुलकर्णी यांच्या कडे इ.स.११३८ च्या सुमारास आपेगाव येथील कुलकर्णी पण होते. त्रिंबकपंत यांना हरिपंत आणि गोविंदपंत अशी दोन मुले होती.बीड मध्ये गोविंदपंत यांना पत्नी रमाबाई यांच्या पासून एक पुत्र झाला त्यांचे नाव विठ्ठलपंत हेच संत ज्ञानेश्वरांचे वडील होय. पुढे विठ्ठलपंत हे आळंदी येथे स्थायिक झाले. तेथे त्यांना निवृत्तीनाथ, ज्ञानदेव ,सोपान व मुक्ताबाई अशी चार अपत्ये झाली. पुढे गोविंदपंत यांनी बीड शहरातील बिंदुसरा नदीच्या काठावर समाधी घेतली. त्यांचे वंशज बीड येथील दत्त मंदिर गल्ली येथील विठ्ठल मंदिरात पुजारी असून त्यांचे आडनाव रामदासी आहे. पेशव्यांच्या काळात पूर्वी गोविंदपंत यांच्या समाधीचा जिर्णोद्धार झाला होता.

कसा झाला समाधीचा जीर्णोद्धार-

बिंदुसरा नदीच्या काठावरील ही समाधी दुर्लक्षित होती. दिवंगत इतिहास अभ्यासक शक्तिकुमार केंडे, तसेच डॉक्टर सतीश साळुंखे पत्रकार जगदीश पिंगळे आणि दिनेश लिंबे कर यांनी ही समाधी उजेडात आणली. पुढे समाधीच्या जीर्णोद्धाराचे काम नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या पुढाकारतून झाले. आळंदी येथील डॉ. किसन महाराज साखरे व मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या उपस्थितीत ११ लाख रुपये खर्चून समाधीचा जीर्णोद्धार झाला . बीड येथील श्री. ज्ञानेश्वरी सत्संग मंडळाने पदाधिकाऱ्यांनी मागील अनेक वर्षांत केलेल्या संशोधनानंतर समाधीचा जिर्णोद्धार झाला.Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.