ETV Bharat / state

बीडच्या मदतीसाठी सरसावले रोहित पवार, 5 हजार ओआरएस दिले भेट - बीड ओआरएस

आमदार रोहित पवारांनी बीड जिल्हा रुग्णालयाला ओरल रिहायड्रेटटिंग सोल्युशन (ओआरएस) हे बारामती ॲग्रोच्या माध्यमातून भेट दिले आहेत. बीड जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात 5 हजार पेक्षा अधिक ओआरएस पाठवून दिल्याचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सांगितले आहे.

beed
beed
author img

By

Published : Jun 9, 2021, 7:43 PM IST

बीड - कोरोनाच्या बिकट काळात रुग्णांवर उपचार सुरू असताना ओरल रिहायड्रेटटिंग सोल्युशन (ओआरएस) बारामती ॲग्रोच्या माध्यमातून आमदार रोहित पवार यांनी दिले. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते बुधवारी (9 जून) बीड जिल्हा रुग्णालय येथे हे ओआरएस वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा रुग्णालय, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सूर्यकांत गीते हे उपस्थित होते. याची माहिती आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिली.

बीडच्या मदतीसाठी सरसावले रोहित पवार, 5 हजार ओआरएस दिले भेट

आमदार संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते वाटप

बीड जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात 5 हजार पेक्षा अधिक ओआरएसा पाठवून दिले. यामध्ये बीड जिल्हा रुग्णालय येथील रुग्ण व पोलीस अधीक्षक कार्यालय यांना हे ओआरएस वाटप करण्यात आले. बुधवारी जिल्हा रुग्णालय येथे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यापूर्वी आमदार रोहित पवारांनी केली होती टँकरची मदत

तीन वर्षापूर्वी बीड जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. पिण्याचे पाणी गावागावांमध्ये वाटप करण्यासाठी जिल्ह्यातील 11 तालुक्यांसाठी बारामती ॲग्रोच्या माध्यमातून आमदार रोहित पवार यांनी बीड जिल्ह्यासाठी पाण्याचे टँकर दिले होते. आता आरोग्याच्या संबंधी त्यांनी बीड जिल्ह्यासाठी मदत केली आहे, असे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सांगितले.

हेही वाचा - Mumbai Rains मुंबई तुंबताच अमृता फडणवीस यांचे ट्विट, म्हणाल्या...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.