ETV Bharat / state

जिल्ह्याच्या सीमा सील करूनही धडकतायेत जिल्ह्याबाहेरील नागरिकांचे लोंढे

28 तारखेला जिल्ह्याच्या सीमा बंद करण्याची घोषणा केली त्यादिवशी जिल्ह्यातील 14 चेकपोस्टवरुन आलेल्या प्रवाश्यांची संख्या 47 हजार 409 इतकी होती. 29 तारखेला तो आकडा 48 हजार 915 इतका झाला आहे. म्हणजे जिल्ह्याच्या सीमा सील केल्यानंतरही हजारो लोक जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

corona virus lockdown in india
जिल्ह्याच्या सीमा सिल करून ही धडकतायेत जिल्ह्याबाहेरील लोंढे
author img

By

Published : Mar 30, 2020, 7:39 AM IST

Updated : Mar 30, 2020, 8:26 AM IST

बीड- कोरोना विषाणूचा फैलाव जिल्ह्यात होऊ नये, यासाठी जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. मात्र, तरी देखील जिल्ह्यात इतर जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात नागरिकांचे लोंढे येत आहेत. हा प्रकार जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख राहुल रेखावार यांनी लक्ष घालून जर थांबवला नाही, तर मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

जिल्ह्याच्या सीमा सील करूनही धडकतायेत जिल्ह्याबाहेरील लोकांचे लोंढे

रविवारी दुपारनंतर बीडमध्ये काही मजूर दाखल झाले असून त्यांना निवारागृहात ठेवण्याची व्यवस्था केली जात असल्याची माहिती आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या सर्व सीमा सील केल्याची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतरही बीड जिल्ह्यात वेगवेगळ्या चेकपोस्टवरुन लोक येत असल्याचे चित्र आहे. विशेषत: मजुरांची संख्या यात मोठी आहे. जिल्ह्याच्या सीमा सील केलेल्या असतानादेखील नागरिकांचे लोंढेच्या लोंढे परजिल्ह्यांतून या जिल्ह्यात येतातच कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आरोग्यविभागाच्या आकडेवाडीवर नजर टाकली, तर ही गोष्ट स्पष्ट होऊ शकते. 28 तारखेला जिल्ह्याच्या सीमा बंद करण्याची घोषणा केली त्यादिवशी जिल्ह्यातील 14 चेकपोस्टवरुन आलेल्या प्रवाश्यांची संख्या 47 हजार 409 इतकी होती. 29 तारखेला तो आकडा 48 हजार 915 इतका झाला आहे. म्हणजे जिल्ह्याच्या सीमा सील केल्यानंतरही हजारो लोक जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

राज्याच्या वेगवेगळ्या भागातून ऊसतोड मजूर बीड जिल्ह्यात परत येण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच इतरही मजूर जिल्ह्यात दाखल होत आहेत. रविवारी दुपारी असे काही लोक बीड शहरात आल्यानंतर त्यांची निवारागृहात सोय करण्याच्या हालचाली सुरू होत्या.

Last Updated : Mar 30, 2020, 8:26 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.