ETV Bharat / state

Snake Bite : शेताला पाणी देण्यासाठी गेलेल्या तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू - Farmers Die Due To Snake Bite

गेवराईच्या निपाणी जवळकात तरुण शेतकऱ्यांचा सर्पदंश झाल्याने मृत्यू ( Farmers Die Due To Snake Bite ) झाला. शेतात काल रात्री पाणी देत असताना ही घटना ( Snake Bite While Watering Field ) घडली.

snake bit
तरुणाला सर्पदंश
author img

By

Published : Nov 19, 2022, 4:53 PM IST

बीड : सर्पदंश झाल्याने गेवराईच्या निपाणी जवळका येथील तरुण शेतकऱ्यांचा मृत्यू ( Farmers Die Due To Snake Bite ) झाला. श्री रामेश्वर भागवतराव लोणकर असे शेतकऱ्याचे नाव आहे. शेतात काल रात्री पाणी देत असताना ही घटना ( Snake Bite While Watering Field ) घडली. तात्काळ त्यांना औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्दैवाने त्यांचे अखेर निधन झाले आहे.

दिवसा लाईटची मागणी : रात्रीची लाईट बंद करून दिवसा लाईट देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. परंतू सरकार ही मागणी कधी पुर्ण करणार आजपर्यंत सरकारकडे अनेक मागण्या दिल्या या रात्रीच्या लाईट देण्यामुळे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात, सर्पदंश, शॉक लागणे अशा प्रकारच्या अनेक घटना झाल्या आहेत. सरकार याकडे कधी लक्ष देणार आज या घटनेने गेवराई तालुक्यात सर्वत्र हळूहळू व्यक्त होत आहे.

सरकारचे दुर्लक्ष: बीड जिल्ह्यामध्ये परतीचा पाऊस झाला आणि याच परतीच्या पावसानं बीड जिल्ह्यातील सर्वच लहान मोठे तलाव भरले यामुळे शेतकऱ्यांच्या अशा पल्लवीत झाल्या आणि शेतकऱ्यांना दुबार पीक पेरणी केली. हे पीक सध्या पाण्याला आले आहे. मात्र शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देण्यासाठी दिवसा लाईट द्या अशी मागणी शेतकरी गेल्या अनेक दिवसापासून करत आहेत. मात्र सरकार यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांचे बळी गेलेले आहेत.

हिंस्र प्राण्याचा त्रास: त्यातच गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथील रामेश्वर लोणकर या तरुण शेतकऱ्यांचा सर्पदंश होऊन मृत्यू झाला रात्री लाईट असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. एकीकडे थंडी पडत आहे. तर दुसरीकडे मात्र दिवसाच्या लाईट अभावी अनेक शेतकऱ्यांना रात्रीचे दारे धरावे लागत आहेत. रात्री विंचू, साप, लांडगे, रानडुक्कर, बिबट्या यांसह अनेक हिंस्र प्राण्याचा त्रास शेतकऱ्याला सहन करावा ( Wild Animal Attack ) लागत आहे.

शासनाचे दुर्लक्ष : जिल्ह्यात अनेक संघटना राजकीय नेते शेतकऱ्यांना व्यवस्थित लाईट पुरवठा करा व दिवसा लाईट द्या अशी मागणी करून सुद्धा शासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळणार का ? असाच प्रश्न यानिमित्ताने उपस्थित राहत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.