ETV Bharat / state

बीडमधील व्यापाऱ्यांची माणुसकी, 2 महिन्यांपासून गरजूंना देतायेत मोफत जेवण - बीडमधील व्यापाऱ्यांची गरजूंना मदत

लॉकडाऊन सुरू झाले तसे बीडच्या व्यापाऱ्यांनी अन्नदानाचे काम हाती घेतले आहे. सलग दोन महिन्यांपासून व्यापाऱ्यांकडून अन्नदान सुरू आहे. बीडमधील वैष्णव देवी मंगल कार्यालयात स्वयंपाक बनवून शहरातील वेगवेगळ्या भागात गरजू भुकेलेल्यांना पोहोच केला जातो.

बीडमधील व्यापाऱ्यांची गरजूंना मदत
बीडमधील व्यापाऱ्यांची गरजूंना मदत
author img

By

Published : May 21, 2020, 3:06 PM IST

Updated : May 21, 2020, 3:47 PM IST

बीड - लॉकडाऊन सुरू झाले तसे बीडच्या व्यापाऱ्यांनी अन्नदानाचे काम हाती घेतले आहे. सलग दोन महिन्यांपासून व्यापाऱ्यांकडून अन्नदान सुरू आहे. बीडमधील वैष्णव देवी मंगल कार्यालयात स्वयंपाक बनवून शहरातील वेगवेगळ्या भागात गरजू भुकेलेल्यांना पोहोच केला जातो. यामध्ये दोन वेळचे जेवण अगदी वेळेत गरजूंपर्यंत पोहोचवले जाते.

या उपक्रमामध्ये व्यापारी स्वतः दिवसातील दोन-तीन तास स्वयंपाक कामात मदत करतात. सकाळी सहा वाजता स्वयंपाकाला सुरुवात केली जाते. यानंतर साधारणतः अकरा वाजेपर्यंत स्वयंपाक पूर्ण होऊन डबे पोहोच करण्याचे काम सुरू केले जाते. बीड शहरातील नागरिक संतोष सोहनी यांच्या मंगल कार्यालयात जेवणाचे डबे बनवण्याचे काम चालते.

बीडमधील व्यापाऱ्यांची गरजूंना मदत

स्वयंपाकाचा खर्च -

मागील दोन महिन्यापासून खंड न पडू देता दररोज दोनशे ते अडीचशे गरजू भुकेलेल्यांना जेवण देण्याचे काम बीडमध्ये व्यापाऱ्यांनी केले आहे. यात दोन वेळेच्या जेवणासाठी साधारणतः 30 ते 35 हजार रुपये खर्च येत असल्याचे व्यापारी म्हणाले.

बीड जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे. त्यामुळे मजुरांची संख्या मोठी आहे. सोबतच लॉकडाऊनच्या काळात जे लोक बीड शहरात दवाखान्याच्या अथवा इतर कामासाठी येतात त्या लोकांनादेखील आम्ही जेवणाचे डबे पोहोच केले असल्याचे व्यापारी शिवप्रसाद दायमा म्हणाले.

Last Updated : May 21, 2020, 3:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.