अंबाजोगाई (बीड)-मराठा आरक्षणाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी धक्कादायक निकाल दिला. मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्द करण्याचा निर्णय न्यायालयाने सुनावला. या निर्णयामुळे मराठा समाजातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ठीक ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलने करण्यात येत आहेत. तर अंबाजोगाईतील तरुणांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. अजय पवार असे त्याचे नाव आहे.
मराठा समाजातील युवक अजय पवार हा युवक बुधवारी रात्री नऊ वाजल्यापासून अंबाजोगाई येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसून आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात त्याने प्रचंड घोषणाबाजी केली. मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, असा मनोदय अजय पवार व्यक्त करत आहे. तसेच मराठा आरक्षण संबंधित कायद्याला न्यायालयीन प्रक्रियेत टिकविण्यात राज्य आणि केंद सरकार अपयशी ठरल्याचा आरोप आंदोलक अजय पवार याने केला आहे.
कोरोनाकाळ असल्याने अशा प्रकारे आंदोलन करणे योग्य नाही. त्यामुळे वकील माधव जाधव, संतोष लोमटे, प्रशांत आदनाक,लहूजी शिंदे राणा यांनी अजयची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अजय सोबत मराठा समाजातील तरुणांनी आंदोलनाचा ठाम निर्णय घेतला आहे.