ETV Bharat / state

वडिलांचा खून करणाऱ्या मुलाला जन्मठेप ; अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल - काकासाहेब कर्डिले

बीडमधील आष्टी तालुक्यातील कडा येथील कर्डिले वस्तीवर ३ वर्षापूर्वी शुल्लक कारणावरून एकुलत्या एक मुलाने वडिलांचा खून केला होता. या प्रकरणी बुधवारी खून करणाऱ्या मुलाला दोषी ठरवत जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

जिल्हा व सत्र न्यायालय, बीड
author img

By

Published : Feb 28, 2019, 10:04 AM IST

बीड - आष्टी तालुक्यातील कडा येथील कर्डिले वस्तीवर ३ वर्षापूर्वी शुल्लक कारणावरून एकुलत्या एक मुलाने वडिलांचा खून केला होता. या प्रकरणी बुधवारी खून करणाऱ्या मुलाला दोषी ठरवत जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याशिवाय १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

संपत काकासाहेब कर्डिले (२७) याने वडील काकासाहेब किसन कर्डिले (४५) यांची शुल्लक कारणावरून तलवारीने वार करत हत्या केली होती. ही घटना २ जून २०१७ ला रात्री साडे अकराच्या दरम्यान कर्डिले वस्तीवर घडली होती. लग्नानंतर संपत आई-वडिलांपासून वेगळा राहत होता. वडील आणि मुलगा यांच्यात सतत भांडणे होत असत. घटनेच्या रात्री ८ वाजता संपत्तीवरून पिता-पुत्रांमध्ये जोराचे भांडण झाले. याच भांडणाचे रुपांतर मोठ्या वादात झाले आणि संपतने तलवारीने वडिलांवर वार केले. यात काकासाहेब कर्डिले यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर संपत फरार झाला.

घटनेनंतर मृत काकासाहेब यांचे बंधू दत्तात्रय किसन कर्डिले यांच्या तक्रारीवरून आष्टी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. यानंतर संपत याला पोलिसांनी जेरबंद केले आणि त्याच्या विरोधात दोषारोप पत्र जिल्हा न्यायालयात सादर केले. याप्रकरणी सुनावणी झाल्यानंतर सर्व साक्षी, पुरावे ग्राह्य धरून न्यायमूर्ती यु. टी. पोळ यांनी आरोपी संपतला दोषी ठरवत जन्मठेप आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

undefined

Intro:खालील बातमी चा(बीड न्यायालयाच्या प्रवेशद्वाराचा) फोटो मेल वर पाठवला आहे.....
**************************

जन्मदात्याचा खून केलेल्या मुलाला जन्मठेपेची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
बीड- एका शुल्लक कारणावरून एकुलता एक मुलाने ती त्याचा निर्घुण खून केल्याची घटना बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कडा येथील कर्डिले वस्तीवर तीन वर्षापूर्वी गर्दी होती. हे प्रकरण अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय यु. टी. पोळ यांच्या समोर आल्यानंतर बापाचा खून करणाऱ्या त्या मुलाला दोषी ठरवत जन्मठेपेची सजा बुधवारी सुनावली आहे. याशिवाय एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

Body:संपत काकासाहेब करडिले (वय 27) याने वडील काकासाहेब किसन कर्डिले (वय 45) यांची शुल्लक कारणावरून तलवारीने वार करत हत्या केली होती. ही घटना 2 जून 2017 रोजी रात्री साडे अकराच्या दरम्यान करडिले वस्ती तालुका आष्टी येथे घडली होती. विशेष म्हणजे संपत हा काका साहेबांचा एकुलता एक मुलगा आहे. लग्नानंतर संपत आई-वडिलांपासून वेगळा राहत होता. वडील व मुलगा संपत यांच्यात सतत भांडणे होत होती. घटनेच्या रात्री आठ वाजता काकासाहेब व संपत्ती या पिता-पुत्रांमध्ये जोराचे भांडण झाले होते. याच भांडणाचे रुपांतर मोठ्या वादात झाले व संपत ने तलवारीने वडीलांवर सपासप वार केले.

Conclusion:यामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले वडील काकासाहेब कर्डिले हे यांचा मृत्यू झाला. वडील गतप्राण झाल्याचे पाहून संपत फरार झाला होता. मयत काकासाहेब यांचे बंधू दत्तात्रय किसन कर्डिले यांच्या तक्रारीवरून आष्टी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. संपत याला अखेर पोलिसांनी जेरबंद केले व त्याच्या विरोधात दोषारोप पत्र जिल्हा न्यायालयात सादर केले. याप्रकरणी सुनावणी झाली साक्षी पुरावे ग्राह्य धरून न्यायमूर्ती यांनी आरोपी संपला दोषी ठरवत जन्मठेप व हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील अनिल तिडके यांनी काम पाहिले त्यांना जिल्हा सरकारी वकील अजय राख यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रकरणात साक्षीदार तपासले फिर्यादी मयताचे आई, वैद्यकीय अधिकारी तसेच तपासी अधिकारी यांच्या साक्षी या शिवाय इतर पुरावे व सरकारी वकील यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.