ETV Bharat / state

प्रजासत्ताकदिनी कोकणकड्यावर फडकला सर्वात मोठा तिरंगा - beed breaking news

भारतीय प्रजासत्ताक दिनी एवरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररने हरिश्चंद्रगड गडावरील कोकणकड्यावर 73 फुटी तिरंगा फडकवला. या वेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन 45 लोकांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jan 31, 2021, 5:35 PM IST

अंबाजोगाई (बीड) - भारतीय प्रजासत्ताक दिनी एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररने विक्रम केला असून हरिश्चंद्रगड गडावरील कोकणकड्यावर 73 फुटी तिरंगा फडकवून राष्ट्रगीताचे गायन केले. मराठी चित्रपट तारका मीरा जोशी व आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक आनंद बनसोडे यांसह बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईचे नागेश जोंधळेही या मोहिमेत सहभागी झाले होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळपास 45 लोकांनी या मोहिमेत सहभागी होऊन विक्रम नोंदवला आहे.

नंदुरबार, धुळे, उस्मानाबाद, सोलापूर, नाशिक, नगर, पुणे, मुंबई, नांदेड येथील 45 लोकांनी 3 दिवसांच्या या ट्रेकिंग मोहिमेत सांधण दरी व हरिश्चंद्रगड सर करून 26 जानेवारीला सकाळी 7.30 वाजता 73 फुटी तिरंगा फडकवला.

यावेळी बोलताना आनंद बनसोडे म्हणाले, प्रत्येकासाठी हा अभिमानाचा क्षण असून कोकणकड्यावर तिरंगा फडकवताना अतिशय अभिमान वाटला. 360 एक्सप्लोरर मार्फत अशा अनेक मोहिमा आयोजित करून साहसी खेळाच्या प्रसारासाठी काम करण्याचा मानस आहे. ही मोहीम युनायटेड नेशन्सच्या गोल्ससाठी समर्पित होती.

अंबाजोगाईकरांची मान उंचावणारी कामगिरी

अंबाजोगाई शहराच्या शैक्षणिक क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व नागेश जोंधळे हे मागील एक दशकापासून शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात मोलाचे योगदान देत आहेत. असे असतानाच त्यांनी कोकणकडा येथील मोहिमेत सहभागी झाले. भारतीय प्रजासत्ताक दिनी तरुणांना प्रेरित करत मोहिमेत सहभागी होऊन हा विश्वविक्रम प्रस्थापित केल्यामुळे जोंधळे यांनी अंबाजोगाईकरांची मान जगात उंचावली आहे, अशी प्रतिक्रिया अंबाजोगाईच्या नगराध्यक्षा रचना मोदी यांनी दिली.

तो क्षण आमच्यासाठी अभिमानाचा

भारतीय तिरंगा ध्वज कोकणकड्यावर फडकताना खूप आनंद वाटत होता. प्रत्येकासाठी हा क्षण अभिमानाचा होता. ही मोहीम युनायटेड नेशन्सच्या गोल्ससाठी समर्पित असल्याचे एव्हरेस्टवीर आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक आनंद बनसोडे यांनी सांगितले होते. कोकणकड्यावर केलेल्या विक्रमाची 'हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' व 'इंडिया रेकॉर्ड'मध्ये नोंद झाल्यामुळे तो क्षण आमच्यासाठी अभिमानाचा असल्याची प्रतिक्रिया नागेश जोंधळे यांनी दिली.

हेही वाचा - वरीष्ठ तंत्रज्ञ शिवाजी गोरे यांना महावितरणाचा 'उत्कृष्टता पुरस्कार' जाहीर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.