ETV Bharat / state

बेघरांना जिव्हाळा संस्थेत मिळतोय आधार; ६३ जणांचा केला जातोय सांभाळ - बीडमधील निवारा केंद्र

बीड शहरात रस्त्याच्या कडेला भीक मागणाऱ्या महिला व पुरुषांना जिव्हाळा शहरी बेघर निवारा केंद्रात आणले जाते. त्यांच्या जेवण आणि राहण्याची सोय केली जाते. तसेच त्यांना उदरनिर्वाहासाठी काम उपलब्ध करून दिले जाते.

jivhala-shahari-beghar-nivara-kendra-is-taking-case-of-helpless-and-needy-people-in-beed
बेघरांना जिव्हाळा संस्थेत मिळतोय आधार; ६३ जणांचा केला जातोय सांभाळ
author img

By

Published : Nov 21, 2020, 1:17 PM IST

बीड - काहींना आपल्या रक्ताच्या नात्यानेच बेघर केले आहे. तर काहींच्या आयुष्यात अपघाताने बेघर होण्याची वेळ आली आहे. या परिस्थितीमुळे अनेकांवर रस्त्याच्या कडेला भीक मागून पोट भरण्याशिवाय पर्याय नाही. अशा बेघर नागरिकांना बीडमध्ये 'जिव्हाळा शहरी बेघर निवारा केंद्र' यांनी आधार दिला आहे. शहरात रस्त्याच्याकडेला भीक मागणाऱ्या महिला व पुरुषांना या बेघर निवारा केंद्रात आणले जाते. यामध्ये काहीजण भोळसर तर काही मनोरुग्ण देखील असतात. त्यांना केंद्रात आणल्यानंतर अगोदर स्वच्छ राहण्याच्या संदर्भात त्यांचे समुपदेशन केले जाते. एवढेच नाही तर बेघर केंद्रात राहत असलेल्या मनोरुग्ण पुरुषांची दाढी कटिंग देखील केली जाते. सेवाभावी वृत्तीने काम करत असलेल्या जिव्हाळा बेघर केंद्राच्या कार्याबाबत 'ईटीव्ही भारत' ने घेतलेला हा विशेष आढावा.

आयुष्यात नियतीने आघात केल्यामुळे रस्त्यावर -

केंद्र सरकार व बीड नगरपालिका यांच्या अर्थसहाय्यातून उभा राहिलेल्या या बेघर केंद्रात आजघडीला 63 बेघर लोकांचा सांभाळ केला जातो. केंद्राचे व्यवस्थापक व सामाजिक कार्यकर्ते राजू वंजारे आणि शालिनी परदेशी या कामाबाबत सांगताना म्हणाल्या की, तीन वर्षांपूर्वी आम्ही हे काम सुरू केले. आमच्याकडे जिव्हाळा बेघर केंद्रात पुरुषांबरोबरच महिलादेखील वास्तव्यासाठी आहेत. आम्ही रस्त्याच्या कडेला भीक मागणारे महिला अथवा पुरुष शोधून काढतो. पहिल्या भेटीत भिकाऱ्यांशी हितगुज करतो. त्यांचा विश्वास संपादन करतो. त्यांना आमच्याशी बोलण्यास भाग पाडतो. अनेक भिकारी त्यांच्या पूर्व आयुष्याबाबत घडलेली 'आप बीती' सांगताना भेदरलेल्या अवस्थेत असतात. मात्र हळूहळू त्यांच्याशी सलगी वाढल्यानंतर ते बोलायला लागतात. मग त्यांना आम्ही आमच्या जिव्हाळा बेघर केंद्रात वास्तव्याला येण्याबाबत विनंती करतो.

बीडच्या जिव्हाळा शहरी बेघर निवारा केंद्रात ६३ जणांचा सांभाळ

महिलांना रस्त्यावर राहताना येणाऱ्या अडचणी -

मागील तीन वर्षाच्या कामाच्या अनुभवावरून जन्मताच कोणी भोळसर अथवा भीक मागणारा व्यक्ती नसतो. त्यांच्या आयुष्यावर काहीतरी विपरीत आघात झालेला असतो. रक्ताच्या नात्याकडूनच हे लोक दुखावलेले असतात. अशा परिस्थितीत ना नातेवाईक मदत करतात, ना सगेसोयरे. पर्यायाने यांच्यावर रस्त्याच्या कडेला भीक मागून जगण्याची वेळ येते. यामध्ये जर महिला व ती जर तरुण असेल तर तिच्या अनेक समस्या असतात. अशा बेघर महिलांचा फायदा घेऊन त्यांच्यावर अत्याचार होतो. या सगळ्या बाबी घडू नयेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या बेघर केंद्राची निर्मिती झालेली आहे, असे सामाजिक कार्यकर्त्या शालिनी परदेशी म्हणाल्या.

jivhala-shahari-beghar-nivara-kendra-is-taking-case-of-helpless-and-needy-people-in-beed
बेघर केंद्रात राहत असलेल्या मनोरुग्ण पुरुषांची दाढी कटिंग केली जाते..

हेही वाचा - 'हॅप्पी इंडियन व्हिलेज'चा उपक्रम : एचआयव्हीबाधित अनाथ मुले आत्मनिर्भर, सेवालयात फुलली शेती

केवळ सांभाळच नाही तर उदरनिर्वाहासाठी व्यवसायाचे प्रशिक्षण -

शहरी बेघर निवारा केंद्रात वास्तव्यासाठी आलेल्या या भिकाऱ्यांना व वेडसर तसेच भोळसर असलेल्यांना दोन वेळेचे जेवण, चहा, नाष्टा दिला जातो. यांच्यातील जे बरे आहेत, म्हणजे परिस्थितीमुळे भीक मागत आहेत. अशा महिला व पुरुषांच्या हाताला काम मिळवून देण्याची जबाबदारी देखील बेघर केंद्रात पार पाडली जाते. येथे वास्तव्य करणारे अनेक पुरुष वॉचमन अथवा इतर मिळेल ती छोटी-मोठी कामे करतात. तर महिला देखील झाडूपोछा, रिसेप्शनिस्ट किंवा संस्थेकडून मिळेल ती कामे करून स्वतःचा उदरनिर्वाह करत स्वाभिमानाने जगतात, असे राजू वंजारे व अभिजीत वैद्य यांनी सांगितले.

शारीरिक व्यंग असलेल्यांच्या मदतीसाठीदेखील संस्थेत वेगवेगळी कामे दिली जातात. केवळ शारीरिक व्यंग असल्यामुळे कुठलं काम करता येत नाही, अशी भावना मनामध्ये बळावल्यामुळे अनेकजणांना भीक मागून उदरनिर्वाह करावा लागतो. अशांना शोधून संस्थेने निवारा देण्याबरोबरच विणकाम, छोट्या-मोठ्या वस्तू बनवणे अशी कामे देऊन आत्मनिर्भर बनवले असल्याचे बेघर निवारा केंद्रातील लाभार्थी सांगतात.

हेही वाचा - खऱ्या अर्थाने 'आत्मनिर्भर' असणारी ओदानथुरई पंचायत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.