बीड - जिल्ह्यात राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी जिजाऊंना वंदन करत पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. जयंतीनिमित्त रक्तदान शिबीरही घेण्यात आले.
हेही वाचा - राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विविध स्तरातून अभिवादन
बीड शहरातील जिजाऊ यांच्या पुतळ्याला वंदन करण्यासाठी महिलांची कार्यक्रमाला मोठी गर्दी होती. यावेळी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाला बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, आमदार विनायक मेटे, नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांची उपस्थिती होती. यावेळी महिलांनी जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले.