ETV Bharat / state

बीडमध्ये आगमन होताच भाजपच्या अंतर्गत गटबाजीचे मुख्यमंत्र्यासमोरच प्रदर्शन - MahaJanadeshYatra beed

मुख्यमंत्र्यांच्या नियोजित दौऱ्यामध्ये आष्टी येथील सभेचे नियोजन होते. मात्र, आमदार सुरेश धस यांच्या आग्रहामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कडा येथे आयोजित कार्यक्रमात थांबून भाषण करावे लागले. आष्टीच्या महाजनादेश यात्रेचे नियोजन आमदार भिमराव धोंडे यांच्याकडे होते, तर कडा येथे आमदार सुरेश धस यांनी स्वतंत्र नियोजन केले होते. या दोन्ही कार्यक्रमांमधून धस-धोंडे यांच्या गटबाजीचे प्रदर्शन मुख्यमंत्र्याचा समोरच पाहायला मिळाले.

बीड
author img

By

Published : Aug 26, 2019, 8:04 PM IST

बीड - महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बीड जिल्ह्यात आगमन झाले. यादरम्यान आष्टी विधानसभा मतदारसंघात त्यांना भाजप अंतर्गत गटबाजीचे प्रदर्शन पाहायला मिळाले. मुख्यमंत्र्यांच्या नियोजित दौऱ्यामध्ये आष्टी येथील सभेचे नियोजन होते. मात्र, आमदार सुरेश धस यांच्या आग्रहामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कडा येथे आयोजित कार्यक्रमात थांबून भाषण करावे लागले. आष्टीच्या महाजनादेश यात्रेचे नियोजन आमदार भिमराव धोंडे यांच्याकडे होते, तर कडा येथे आमदार सुरेश धस यांनी स्वतंत्र नियोजन केले होते. या दोन्ही कार्यक्रमांमधून धस-धोंडे यांच्या गटबाजीचे प्रदर्शन मुख्यमंत्र्याचा समोरच पाहायला मिळाले. याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती.

बीड

याशिवाय आष्टी येथील महाजनादेश यात्रेमध्ये कार्यकर्त्यांनी 'आष्टी का आमदार कैसा हो, जयदत्त धस जैसा हो, अशा घोषणा दिल्यामुळे आमदार धोंडे समर्थक यांनी नाराजी व्यक्त केली.

जिल्ह्याचा दुष्काळी कलंक पुसून टाकू

मराठवाड्याला आता दुष्काळमुक्त करणार असून बीड जिल्ह्याला कृष्णा खोऱ्याचे पाणी मिळणारच आहे. येत्या वर्षभरात हे काम पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत. कोकणातील वाहून जाणारे पाणी मराठवाड्याकडे वळविण्याचे काम देखील येणाऱ्या काळात होणार आहे. प्रत्येक गावात पाणी पोहचविण्याचे काम वॉटरग्रीडच्या माध्यमातून केले जाणार आहे. कृष्णेचे पाणी बीडमध्ये तर कोकणातील पाणी गोदावरी खोऱ्यात आणून बीड जिल्ह्याचा दुष्काळी कलंक पुसून टाकण्याचे काम आम्ही करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडा आणि आष्टी येथील जाहीर सभेत बोलताना केले.

यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे, जलसंधारणमंत्री राम शिंदे, खासदार प्रितम मुंडे, खासदार सुजय विखे, आमदार संगिता ठोंबरे, आमदार लक्ष्मण पवार, आमदार शिवाजी कर्डीले, आमदार निरंजन डावखरे, सुरजितसिंह ठाकूर, आमदार मोनिका राजळे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये, माजी आमदार साहेबराव दरेकर आदी उपस्थित होते.

आमदार धस यांनी वाजवला ढोल -

बीड जिल्ह्यातील करा येथे आमदार सुरेश धस यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या स्वागतादरम्यान धस यांनी स्वतः ढोल वाजवत मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले, याची सर्वत्र चर्चा झाली.

Intro:बीडमध्ये आगमन होताच भाजपच्या अंतर्गत गटबाजीचे मुख्यमंत्र्यासमोरच प्रदर्शन

बीड- महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बीड जिल्ह्यात आगमन झाले. यादरम्यान आष्टी विधानसभा मतदारसंघात भाजप अंतर्गत गटबाजीचे प्रदर्शन पाहायला मिळाले. मुख्यमंत्र्याच्या नियोजित दौऱ्यामध्ये आष्टी येथील सभेचे नियोजन होते. मात्र आ. सुरेश धस यांच्या आग्रहामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कडा येथे आ. धस आयोजित कार्यक्रमात थांबून भाषण करावे लागले. आष्टी च्या महाजनादेश यात्रेचे नियोजन आ. भीमराव धोंडे यांच्याकडे होते. तर कडा येथे आ. सुरेश धस यांनी स्वतंत्र नियोजन केले होते. या दोन्ही कार्यक्रमांमधून धस- धोंडे गटबाजीचे प्रदर्शन मुख्यमंत्र्याचा समोरच पाहायला मिळाले. याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती. याशिवाय आष्टी येथील महाजन आदेश यात्रेमध्ये कार्यकर्त्यांनी 'आष्टी का आमदार कैसा हो जयदत्त धस जेसा हो, अशा घोषणा दिल्यामुळे आ. धोंडे समर्थक यांनी नाराजी व्यक्त केली.

जिल्ह्याचा दुष्काळी कलंक पुसून टाकू - देवेंद्र फडणवीस
मराठवाड्याला आता दुष्काळमुक्त करणार असून बीड जिल्ह्याला कृष्णाखो-याचे पाणी मिळणारच आहे. येत्या वर्षभरात हे काम पुर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत. तर कोकणातील वाहून जाणारे पाणी मराठवाड्याकडे वळविण्याचे काम देखील येणाऱ्या काळात होणार असल्याने प्रत्येक गावात पाणी पोहचविण्याचे काम वाॕटरग्रीडच्या माध्यमातून केले जाणार असून कृष्णेचे पाणी बीडमध्ये तर कोकणातील पाणी गोदावरी खो-यात आणून बीड जिल्ह्याचा दुष्काळी कलंक पुसून टाकण्याचे काम आम्ही करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी कडा आणि आष्टी येथील जाहिर सभेत बोलताना केले.

यावेळी पालकमंञी पंकजा मुंडे, जलसंधारणमंञी राम शिंदे, खा.प्रितम मुंडे, खा.सुजय विखे, आ.संगिता ठोंबरे, आ.लक्ष्मण पवार, आ.शिवाजी कर्डीले, आ.निरंजन डावखरे, सुरजितसिंह ठाकुर, आ.मोनिका राजळे, माजीमंञी बबनराव पाचपुते, भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये, माजी.आ.साहेबराव दरेकर आदी उपस्थीत होते.

आमदार धस यांनी वाजला ढोल-

बीड जिल्ह्यातील करा येथे आमदार सुरेश धस यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या स्वागता दरम्यान आमदार सुरेश धस यांनी स्वतः ढोल वाजवत मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले याची चर्चा झाली.Body:बीडConclusion:बीड
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.