ETV Bharat / state

'रेड झोनमधून गावात आलेल्या व्यक्तींची माहिती प्रशासनाला द्या'

मुंबई, पुणे अथवा इतर कंटेनमेंट झोनमधून गावात आलेल्या व्यक्तींची माहिती तत्काळ जिल्हा प्रशासनाला द्या. जेणेकरून त्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवता येईल, असे आवाहन बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी केले आहे.

beed
बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात
author img

By

Published : May 17, 2020, 5:11 PM IST

बीड - मुंबई, पुणे अथवा इतर कंटेनमेंट झोनमधून गावात आलेल्या व्यक्तींची माहिती तत्काळ जिल्हा प्रशासनाला द्या. जेणेकरून त्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवता येईल, असे आवाहन बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी केले आहे. शनिवारी बीड जिल्ह्यात कोरोनाचे २ रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. चोरट्या मार्गाने बीड जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात
मागील अनेक दिवसापासून बीड जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण नव्हता. मात्र, शनिवारी दोन कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. परजिल्ह्यातून नागरिक मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्यात येत आहेत. जे नागरिक चेक पोस्टवरून नियमांचं पालन करून बीड जिल्ह्यात येत आहेत. त्यांच्यावर आरोग्य विभागाचे पूर्णतः लक्ष आहे. मात्र, जे नागरिक चोरट्या मार्गाने बीड जिल्ह्यामधील गावागावांमध्ये आलेले आहेत. त्यांच्यावर कुठलेच नियंत्रण नाही. याबाबत मागील दोन-तीन दिवसांमध्ये माध्यमांनी वारंवार या विषयावर आपल्या बातम्यांमधून जिल्हा प्रशासनाला सतर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, छुप्या मार्गाने आलेल्या व्यक्तींच्या संदर्भात जिल्हा प्रशासनाने कोणतीही यंत्रणा राबवलेली नव्हती. मात्र, शनिवारी बीड जिल्ह्यातील माजलगाव, गेवराई तालुक्यामध्ये आढळून आलेले दोन्ही पॉझिटिव्ह रुग्ण छुप्या मार्गाने बीड जिल्ह्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. आता तरी जिल्हा प्रशासन गावागावांमध्ये छुप्या मार्गाने आलेल्या व्यक्तींची माहिती घेऊन त्यांना विलगीकरण कक्षात ठेवेल अशी अपेक्षा आहे.बीड जिल्हा आरोग्य विभागाकडून चेक पोस्टवर येणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जात आहे. शनिवारी सापडलेल्या त्या कोरोना पॉझिटिव्ह दोन रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 28 जणांचे रिपोर्ट सोमवारी दुपारपर्यंत येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर थोरात यांनी सांगितले. या पुढच्या काळात प्रत्येक नागरिकाने योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

ग्रामीण भागात विशेष लक्ष देण्याची आवश्यकता-
बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातून कामधंद्याच्या शोधात पुणे-मुंबईला जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे नागरिक परत आपल्या गावी आलेले आहेत. गावी आलेल्या नागरिकांमधील अनेकांनी विनापरवानगी अथवा आरोग्य विभागाला माहिती न देताच गावात प्रवेश केलेला आहे. आशा नागरिकांची माहिती घेऊन त्यांना तत्काळ आरोग्य सेवा मिळवून देण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने योग्य ती मोहीम हाती घेणे आवश्यक आहे. अन्यथा गावे असुरक्षित होऊ शकतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.