बीड- 'अप्रत्यक्ष भाजपला काही जण मदत करत होते. मात्र, मी राष्ट्रवादीत आल्यावर त्यांची गोची झाली. त्यामुळे प्रत्यक्ष भाजपला मदत करण्यासाठी ते पक्ष सोडून गेले,' असा आरोप पक्ष सोडून गेलेल्यांवर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केला.
हेही वाचा- 'मला घरचे जेवण मिळावे,' चिदंबरम यांचा तिहार तुरुंगात अर्ज
'परळी मतदार संघात मोठे विकास कामे करायला वाव आहे. येथे मोठ्या प्रमाणात सिंचनाचे काम करता येवू शकते. कोरडवाहू जमीन बागायती करता येऊ शकते,' असेही मुंडे यांनी सांगितले. '2014 ची निवडणूकही गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाल्यावर लगेच 3 महिन्यात लागली होती. त्या विधानसभेच्या निवडणुकीत लोकसभेची पोटनिवडणूकही लागली होती. त्यामुळे सहानुभूतीचे वातावरण परळीसह महाराष्ट्रभर होते. त्याचा फायदा पंकजा मुंडे यांना त्यावेळी झाला होता. आणि त्यावेळी माझा पराभव 22 हजार मतांनी झाला होता. सहानुभूतीची ती लाट पाहता माझा पराभर हा खूप कमी मतांनी झाला होता,' असे धनंजय म्हणाले.
हेही वाचा- स्मार्टफोनचे नवे युग: दुमडू शकणारा 'सॅमसंग फोल्ड' भारतातही; ही आहेत वैशिष्ट्ये
'आताची 2019 ची निवडणूकही पूर्णत: वेगळी आहे. परळी मतदार संघाला राज्याची आणि देशाची सत्ता तसेच मंत्रीमंडळाच स्थान मिळाले होते. अनेक वर्षापासून हा मतदार संघ विरोधी पक्षात राहिला होता. त्यामुळे विकासाच्या अनुषंगाने ज्या काही अडचणी होत्या, त्याचा शब्द पंकजा मुंडेंनी परळीतील जनतेला दिला होता. मात्र, त्यातला एकही शब्द पंकजा पूर्ण करू शकल्या नाहीत. त्यामुळे मंत्री होऊनही पंकजा मुंडे यांनी विकास केला नाही. हा रोष जनतेच्या मनामध्ये यावेळी आहे,' असे ते म्हणाले.
हेही वाचा- 'भारतातील घुसखोरांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल'
'मी कोणाचा विरोध कराचा म्हणून नाही तर, माझ्या मातीसाठी येथील जनतेसाच्या विकासासाठी निवडणूक लढवतोय. या निवडणुकीत येथील जनतेने मला आशीर्वाद दिला तर येणाऱ्या पाच वर्षात कृषी, उद्योग, सिंचन क्षेत्रासोबत परळी येथील वैद्यनाथाचे तीर्थक्षेत्र यावर काम करुन येथील नागरिकांचे दरडोई उत्पन्न दुप्पट करणार आहे. याच मुद्यावरुन मी ही निवडणूक लढवत आहे,' असेही मुंडे म्हणाले. 'अप्रत्यक्ष भाजपला काही जण मदत करत होते. मात्र, मी राष्ट्रवादीत आल्यावर त्यांची गोची झाली. त्यामुळे ते पक्ष सोडून गेले,' असा आरोप त्यांनी पक्ष सोडून गेलेल्यांवर केला.