बीड - परळी शहरांत डॉ शिवकांत आंधूरे याचे आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे. काही वर्षांपूर्वी आंधुरे यांनी जीवन फडकरी यांच्याकडून भिशीमार्फत सात लाख वीस हजार रुपये घेतले होते. मात्र, फडकरी याने चक्रवाढ व्याजदर करत 1 कोटी 26 लाख मागणी केली होती. त्यांने वारंवार आंधूरे यांना मानसिक त्रास दिला असल्याचे डॉ शिवकांत आंधूरे यांचे म्हणणे आहे. जीवन फडकरी यांनी आयुर्वेदिक हॉस्पिटलामध्ये घुसून मराहाण केल्याचा आरोप आंधूरे यांनी केला आहे. जीवन फडकरी यांनी डॉक्टर शिवकांत आंधुरे यांना लाथा बुक्क्याने मारहाण करत त्यांचे दात पाडले. या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात वंदना शिवकांत आंधुरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला अशी, माहिती परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश कस्तुरे यांनी दिली.
न्याय देण्याची डॉक्टर शिवकांत आंदुरेंची मागणी - जीवन फडकरी,अभय बळवंतसह इतर भाडोत्री गुंड महिला यांनी आंधुरे यांच्या हॉस्पिटलमध्ये शिरत त्यांना केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच पत्नीची छेड काढल्याचा आरोप आंदुरे यांनी केला आहे. आंदुरे दांपत्य त्यांच्या रुग्णालयात असतांना त्यांना जमावासमोर मारहाण करण्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. वंदना आंधुरे, यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप डॉ शिवकांत यांनी केला आहे. मात्र, हॉस्पिटल समोर उपस्थित झालेल्या जमावामुळे वंदना यांचे अपहरण जीवन फडकरी, त्यांच्या साथीदारांना करता आले नाही असे आंधूरे यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, बीड जिल्हा मध्यवर्ती बँक चौसाळा शाखेत मयताच्या खात्यातून परस्पर ६२ हजार ४५० रूपये काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. गावातील कानडीघाट येथील मयत शेतकरी धोंडीबा सर्जेराव कुडके याच्या खात्यातील रक्कम लाटल्याचा प्रकार जिल्हा मध्यवर्ती बँक चौसाळा शाखेत उघडकीस आला आहे. प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत मयताला जिवंत दाखवून जमा रक्कम काढण्यात आली आहे. बीड तालुक्यातील कानडीघाट येथील मयत शेतकरी ग्यानबा बलभीम झोडगे यांच्या खात्यातील १ लाख रूपये परस्पर खात्यातमधुन गायब झाले होते. त्याची चौकशी सुरू असतानाच पुन्हा त्याच गावातील कानडीघाट येथील दुसरे शेतकरी धोंडीबा सर्जेराव कुडके यांच्या खात्यावरील ६२ हजार ४५० रूपये परस्पर काढण्यात आले. आहे. ते जिवंत असल्याचे दाखवून त्यांच्या नावावर प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत जमा रक्कम उचलण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
हेही वाचा - Beed Crime : बापाने पोटच्या पोरावर केले कोयत्याने सपासप वार