बीड - आयसीएमआरच्यावतीने (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) सेरो सर्वेक्षणाचे चौथ्या टप्यात सर्वेक्षण सुरू आहे. यासाठी पथक सोमवारी (21 जून) बीड जिल्ह्यात दाखल झाले. दिवसभरात जिल्ह्यातील वेगवेगळ्या १० गावातील ५०० लोकांच्या रक्ताचे नमुने घेतले जाणार आहेत.
सेरो सर्वेक्षण कशासाठी?
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांच्या शरीरात अँटीबॉडीज किती प्रमाणात तयार झाल्या आहेत? याची माहिती घेण्यासाठी सेरो सर्वेक्षण केले जाते. आतापर्यंत तीन वेळा आयसीएमआरने सेरो सर्वेक्षण केले आहे.
..या जिल्ह्यात होणार सेरो सर्वेक्षण
राज्यातील बीड, परभणी, नांदेड, अहमदनगर, सांगली, जळगाव या 6 जिल्ह्यांचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेतले जात आहेत. पहिल्यांदाच बीड जिल्हा रूग्णालयातील १०० आरोग्य कर्मचाऱ्यांचे रक्ताचे नमुणे घेतले जाणार आहेत. जिल्ह्यातून ५०० नमुने घेतले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र काढून याचे नियोजन केलेले आहे.
या 10 गावात सर्वेक्षण
बीड तालुक्यातील येळंबघाट, आंबेसावळी, पाटोदा तालुक्यातील पारगाव घुमरा, आष्टी तालुक्यातील डोंगरगन, गेवराई तालुक्यातील पांढरवाडी, माजलगाव तालुक्यातील एकदरा, धारूर तालुक्यातील हिंगणी खुर्द, परळी तालुक्यातील धर्मापूरी, माजलगाव शहरातील वॉर्ड क्रं. ४, केज शहरातील वॉर्ड क्रं.७ येथील नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेतले जात आहेत.
जिल्ह्यातील १० गावातून नमुने घेतले जात आहेत. विशेष म्हणजे आरोग्य विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही यावेळी सॅम्पल घेण्यात आली आहे. याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी दिली.
हेही वाचा - अनिल देशमुखांसदर्भातील राज्य सरकारची ती याचिका फेटाळून लावा; अॅड पाटील यांची मागणी