ETV Bharat / state

बीड : कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर मूल होणार नसल्याने पत्नीची बेदम मारहाण करून हत्या - Beed Latest Crime News

दहा वर्षापूर्वी पैठण येथील राधाचा विवाह गेवराई तालुक्यातील इरगाव येथील महादेव आसाराम रेड्डे याच्यासोबत झाला होता. त्यानंतर त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये झाली. मात्र, दुर्दैवाने आठ वर्षांच्या मुलाचा आजाराने दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला. कुटुंब नियोजन केलेल्या पत्नीला आता मूल होणार नाही, शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च लागणार, या संतापातून मुलाचा हव्यास करणार्‍या नराधमाने स्वत:च्या पत्नीस बांधून बेदम मारहाण केल्याने अतिरक्तस्राव होवून पत्नीचा मृत्यू झाला.

बीड मूल होणार नसल्याने पत्नीची मारहाण करून हत्या

author img

By

Published : Feb 6, 2021, 7:40 PM IST

बीड - कुटुंब नियोजन केलेल्या पत्नीला आता मूल होणार नाही, शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च लागणार, या संतापातून मुलाचा हव्यास करणार्‍या नराधमाने स्वत:च्या पत्नीस बांधून बेदम मारहाण केल्याने अतिरक्तस्राव होवून पत्नीचा मृत्यू झाला. या घटनेने संताप व्यक्त होत असून मुलाचा हव्यास करणार्‍या नवर्‍याविरोधात बीड ग्रामीण पोलीसात शनिवारी खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना बीड तालुक्यातील औरंगपुरा शिवारातील कल्याण डरफे यांच्या शेतात घडली. मारहाणीनंतर जखमी महिलेला रुग्णालयात घेवून जाताना तिचा मृत्यू झाला.

आठ वर्षांच्या मुलाचा आजाराने मृत्यू

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी आहे की, दहा वर्षापूर्वी पैठण येथील राधाचा विवाह गेवराई तालुक्यातील इरगाव येथील महादेव आसाराम रेड्डे याच्यासोबत झाला होता. त्यानंतर त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये झाली. मात्र, दुर्दैवाने आठ वर्षांच्या मुलाचा आजाराने दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला. मुलाचा मृत्यू झाल्याने आपल्या वंशाला दिवा नाही म्हणून आता दुसरी बायको करावी लागेल, असा तगादा महादेवने पत्नी राधा हिच्याकडे लावला होता. तसेच, तिला आता मूल होणार नाही, म्हणून रोज मारहाण करत असे.

हेही वाचा - पोलिसांवरील हल्ल्याप्रकरणी कोम्बिंग ऑपरेशनच्या भीतीने इराणी वस्ती झाली 'वीराण'

पत्नीची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याने दुसरे लग्न करण्याचा पतीचा तगादा

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याने आपल्याला मूलबाळ होणार नाही, हे राधालाही माहीत होते. पती सतत तिला शिवीगाळ करत 'पुन्हा ऑपरेशन करूनही तुला मूल झाले नाही तर मी काय करू? पैसेही जातील' म्हणून आता मी दुसरे लग्न करतो असे म्हणत होता. यापूर्वीही महादेव याने पत्नीवर तिला बेदम मारहाण केली होती. हा प्रकार तिने तिच्या माहेरी सांगितला. त्यावेळेस पत्नीच्या घरच्यांनी दोन-चार दिवसात आम्ही पैसे देतो, असे म्हणून तिची समजूत काढली. तसेच, सासरी येऊन जावयाची समजूत काढू असे सांगून तिला परत पाठवले.

हात-पाय बांधून पहाटेपर्यंत मारहाण

शुक्रवारी रात्री मुलाच्या हव्यासापोटी आरोपी महादेव रेड्डे याने पत्नी राधाचे हात-पाय बांधून तिला पहाटे तीन वाजेपर्यंत लाकडी दांड्याने मारहाण केली. नडग्या फोडल्या, संपुर्ण अंगावर लाकडाने मारहाण केली आणि पहाटेच घरातून निघून गेला. सकाळी ९ वाजता रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राधाने शेजारच्या महिलेला हाक मारून मला सोडवा आणि दवाखान्यात घेवून जा, अशी विनंती केली. त्यानंतर शेजारच्या महिलेने ते राहत असलेल्या शेत मालकाला फोन केला. शेत मालक तेथे आल्यानंतर तिला जवळच्या निपाणी येथील दवाखान्यात घेवून जात असताना तिने वाटेतच प्राण सोडले.

आरोपी महादेव रेड्डेविरोधात खुनाचा गुन्हा

या प्रकरणाची माहिती तिच्या माहेरच्या लोकांना मिळाल्यानंतर त्यांनी गेवराई पोलिसांना घेवून घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या घटनेची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रमुख संतोष साबळे, एपीआय योगेश उबाळे, राजपूत यांच्यासह इतर कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठले. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी महादेव रेड्डे याच्या विरोधात मृत राधाचा भाऊ सुनिल राधाकिसन बांगडे (रा. चित्तेगाव, ता. पैठण) यांच्या फिर्यादीवरून ३०२ चा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा - खोपोलीत बिहारी कुटुंबातील 14 वर्षीय मुलीची बापाकडून निर्घृण हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.