ETV Bharat / state

किसान सभेचा मुंबईच्या दिशेने एल्गार; परळी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचा सहभाग

किसान विरोधी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यांच्या समर्थनार्थ अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी 23 जानेवारीपासून मुंबईच्या दिशेने कूच केली आहे.

Kisan Sabha march Mumbai
अजय बुरांडे किसान मोर्चा
author img

By

Published : Jan 24, 2021, 10:44 PM IST

बीड - किसान विरोधी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यांच्या समर्थनार्थ अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी 23 जानेवारीपासून मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. या महामोर्चात बीड जिल्हा व मोहा परिसरातून सातत्याने शेतकऱ्यांचे प्रश्न तडीस लावणारे अजय बुरांडे, प्रभाकर नागरगोजे, मुरलीधर नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी, युवक सहभागी झाले आहेत.

हेही वाचा - 'सुंदर माझे कार्यालय' उपक्रमांतर्गत प्रशासकीय कार्यालयांचा कायापालट

केंद्र सरकारचे कृषी कायदे हानून पाडण्यासोबतच कृषी मालाला उत्पादन खर्चाच्या दीड पट जास्त हमी भाव देणे, सर्व शेतमालाची हमीभावाप्रमाने शासकीय खरेदीची व्यवस्था व्यापक करणे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे, राज्यशासनाची कर्ज माफी योजना नियमित व दोन लाखाहून अधिक कर्ज थकित असणाऱ्या शेतकऱ्यांसठीही लागू करणे, पीक विम्याचे वाटप करणे, या मागण्यांसाठी नाशिकहून मुंबईच्या दिशेने हा महामोर्चा निघाला आहे. या महामोर्चाचे नेतृत्व अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सचिव अशोक ढवळे व राज्य सचिव अजित नवले करत आहेत.

हेही वाचा - आष्टी तालुक्यातील लोणी सय्यमीरचे जवान शरद चांदगुडे अनंतात विलीन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.