ETV Bharat / state

बीडमध्ये सारुळ पाटीजवळ मोटारसायकल आणि कारचा भीषण अपघात; तिघे ठार

केज-बीड मार्गावर सांगवी जवळ असलेल्या सारुळ पाटीवर मंगळवारी सायंकाळी कार व मोटारसायकलचा भीषण अपघातात झाला. या अपघातात तिघे ठार झाले आहेत.

author img

By

Published : Dec 22, 2020, 9:31 PM IST

मोटारसायकल आणि कारचा भीषण अपघात
मोटारसायकल आणि कारचा भीषण अपघात

बीड - केज-बीड मार्गावर सांगवी जवळ असलेल्या सारुळ पाटीवर मंगळवारी सायंकाळी कार व मोटारसायकलचा भीषण अपघातात झाला. या अपघातात तिघे ठार झाले आहेत. कल्याणहून रेणापूर कडे जात असलेल्या कारने मोटार सायकलवरून जात असलेल्या माजी सैनिक सुंदर नामदेव ढाकणे (वय ५३ वर्ष), आप्पाराव बापूराव ढाकणे (वय ८० वर्ष), बहादूर राजाभाऊ पुरी (वय ४८ वर्ष सर्व रा. सारुळ) यांच्या मोटासायकलला मंगळवारी सायंकाळच्या सुमारास कारने जोरादार धडक दिली.

जखमींचा दवाखान्यात घेऊन जात असताना वाटेतच मृत्यू-

या अपघातात मोटारसायकलवरील अप्पाराव ढाकणे हे जागीच ठार झाले. तर सुंदर नामदेव ढाकणे, बहादूर राजाभाऊ पुरी हे जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी अंबाजोगाई येथील दवाखान्यात घेऊन जात असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला.

कारमधील प्रवाशी देखील किरकोळ जखमी-

हा अपघात एवढा गंभीर होता की, अपघातात मोटार सायकल चकनाचूर झाली. कारने धडक दिल्यानंतर मोटार सायकल सुमारे अडीचशे मीटर अंतरावर जाऊन रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पलटी झाली. कारमधील प्रवाशी देखील किरकोळ जखमी झाले आहेत. घटना स्थळावर प्रभारी सहाय्यक निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, पोलीस कर्मचारी गुंजाळ, चालक हनुमंत गायकवाड यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.

हेही वाचा- राम मंदिरासाठी वर्गणीवरून ज्यांच्या पोटात दुखतंय त्यांच्या घरी माणसं पाठवू, फडणवीसांचा शिवसेनेला टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.