बीड - जिल्ह्यात सुरू असलेले गणेश उत्सव तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुका कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असल्याचे बीडचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी सोमवारी सांगितले. हायटेक टेक्नॉलॉजीचा वापर करत ज्याठिकाणी गडबड गोंधळ होण्याची शक्यता आहे, त्याठिकाणी एक 'मोबाईल सीसीटीव्ही व्हॅन' तैनात असेल.
ही मोबाईल व्हॅन त्या ठिकाणचे पूर्ण रेकॉर्डिंग करेल. याशिवाय आकाशातून ड्रोनद्वारे संबंधीत ठिकाणच्या परिस्थितीवर विशेष लक्ष ठेवले जाईल. जर कोणी दंगा करण्याचा प्रयत्न करत असेल तर रेकॉर्डिंग मुळे तात्काळ पोलिसांच्या लक्षात येईल. ही विशेष टेक्नॉलॉजी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या संकल्पनेतून पुढे आली असून मराठवाड्यात प्रथमच बीड जिल्ह्यात याचा प्रयोग केला जात आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.
हे ही वाचा - बीडमध्ये ढोल-ताशाच्या गजरात गणरायांचे उत्साही स्वागत
बीड जिल्ह्यात सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. या गणेशोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. जिल्ह्यात एकूण 1353 गणेश मंडळे आहेत. यापैकी 430 गावात 'एक गाव एक गणपती' आहे.
हे ही वाचा - बीडमध्ये महिलांनी पुढाकार घेत स्थापन केले गणेश मंडळ
गणेशोत्सवाच्या दरम्यान जिल्ह्यात शांतता राहावी यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आले. आहे दारू विक्री करणारे तसेच इतर गुंडांवर 107 प्रमाणे कारवाई केली आहे.
जिल्ह्यात सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात एक विभाग स्थापन करण्यात आला आहे. या विभागांतर्गत जिल्ह्यातील सोशल मीडियावर विशेष लक्ष ठेवले जाते. गणेशोत्सवादरम्यान धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल होऊ नये आणि अशा पोस्ट करणाऱ्यास तात्काळ अटक करण्याचा बंदोबस्त पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार यांनी केला आहे.
हे ही वाचा - 370 कलम रद्द केल्याबद्दल बाप्पाच्या चरणी व्यक्त करणार आनंद - नगरसेवक अरविंद भोसले