बीड Gopinath Munde Birth Anniversary : सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील पांडुरंग मुंडे आणि लिंबाबाई मुंडे यांच्या घरात लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा जन्म १२ डिसेंबर 1949 रोजी झाला होता. वारकरी परंपरेचा वारसा असल्याने वयाच्या 14 वर्षापासून त्यांनी आळंदी पंढरपूर पायी वारी केली. श्रीक्षेत्र भगवानगडाचे महत्व, भगवान बाबा यांचा मुंडे कुटुंबावर आध्यात्मिक प्रभाव होता.
गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन : गोपीनाथ मुंडे यांच्या वडीलांच्या निधनानंतर भाऊ पंडित मुंडे यांनी स्वतःचे शिक्षण सोडून गोपीनाथ मुंडे यांचं शिक्षण पूर्ण केलं होतं. प्राथमिक शिक्षण त्यांचं जिल्हा परिषद शाळेत तर बीकॉमपर्यंत शिक्षण स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात पूर्ण झालं होतं. पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले होते, कॉलेजमध्ये असतानाच गोपीनाथ मुंडें आणि प्रमोद महाजन यांच्याशी मैत्री झाली आणि आयुष्याला कलाटणी मिळाली. पुढे देशात आलेल्या आणीबाणीच्या विरोधात मराठवाड्यात गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन सतत कार्यरत होते. त्याच कालावधीत गोपीनाथ मुंडे यांचा विवाह 21 मे 1978 रोजी प्रज्ञा महाजन म्हणजे प्रमोद महाजन यांची बहीण यांच्याशी झाला. त्यांना तीन कन्या रत्न झाले, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे आणि यशश्री मुंडे.
पक्षीय संघटनात्मक त्यांची कारकीर्द...
1970 मध्ये परळीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम केलं
1980 मध्ये राज्य भारतीय जनता युवा मोर्चाचे पहिले अध्यक्ष
1982 मध्ये महाराष्ट्र राज्य भारताचे सरचिटणीस
1986 मध्ये महाराष्ट्र राज्यात राज्य भाजपचे प्रदेशचे अध्यक्ष
2009 मध्ये महाराष्ट्र राज्य भाजपाचे प्रभारी व लोकसभेतील भाजपाचे उपनेते म्हणून निवड
2012 गोवा विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी गोव्यात
2012 उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक प्रचारासाठी भाजपा तर्फे स्टार प्रचारक
2013 भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीत गोपीनाथ मुंडे यांचा समावेश
महाराष्ट्रात 1978 मध्ये कर्जमुक्तीसाठी मोर्चा काढून कर्जमुक्ती करण्यास भाग पाडले
1992 महाराष्ट्रात राजकारणाच्या गुन्हेगारी विरोधात शिवनेरी ते शिवतीर्थ अशी संघर्ष यात्रा काढली
14 मार्च 2011 भाजपा तर्फे मुंबईत काढण्यात येणाऱ्या माफिया राज हटाव मोर्चा जनजागरण अभियानाचे नेतृत्व
3 ऑक्टोबर 2011 बीडमध्ये ऊस तोडणी आणि वाढवून मिळावी यासाठी देण्यात येणार मोर्चाचे नियोजन करण्यात आलं आणि त्यांना यशही मिळालं
2011 मध्ये जन लोकपाल विधेयकावर अण्णा हजारे यांना पाठिंबा तर 2012 मध्ये पडलेल्या दुष्काळात त्यांनी दुष्काळ दौरा काढला, शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला.
महाराष्ट्र राज्यामध्ये व केंद्र सरकारमध्ये कोणती पदे भूषवली...
१२ डिसेंबर 1992 महाराष्ट्र राज्य विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदी 1992 ते 1995
14 मार्च 1995 महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पद ऊर्जा आणि गृहमंत्री खात्याचा पदांची शपथ 1995 ते 1999 या कालावधीत उपमुख्यमंत्री होते
26 मे 2014 केंद्रीय ग्रामविकास मंत्री मोदींच्या मंत्रिमंडळात शपथ
गोपीनाथ मुंडे यांनी कोणते प्रश्न मांडले होते? :
1) आरक्षण मंडल आयोग शेतकऱ्याचे प्रश्न उपस्थित करत सरकारला घेरत ते प्रश्न सोडवण्याचं काम गोपीनाथ मुंडे यांनी प्रयत्न केलं होतं, काँग्रेस सरकारच्या काळातील सुरेश कलमाडी यांना भ्रष्टाचार प्रकरणी त्यांनी अटक केली होती, मग कृपाशंकर सिंग यांची चौकशीही का केली नाही असा प्रश्न गोपीनाथ मुंडे यांनी सभागृहात केला होता.
2 ) 1980 पासून रखडलेला अहमदनगर -बीड -परळी रेल्वे मार्गाच्या कामाची मागणी अनेक वेळा लोकसभेत केली 2010 च्या जनगणनेत ओबीसींची वेगळी नोंद करण्याची व ओबीसी महिलांसाठी लोकसभेत वेगळ्या आरक्षण मिळवण्याची मागणी केली होती, मुस्लिमांना ओबीसी आरक्षण द्यायला समर्थनाची भूमिका गोपीनाथ मुंडे यांनी घेतली होती त्यांनी ओबीसी मुस्लिमानांना नाही आरक्षणाची मागणी केली होती.
गोपीनाथ मुंडे यांची राजकीय कारकीर्द
1969 बीडच्या आंबेजोगाई कॉलेजमध्ये विद्यार्थी संसदेच्या पहिल्या वर्षी प्रतिनिधींमध्ये निवडणूक लढवली
1978 महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत पराभव
1978 बीड जिल्हा परिषद निवडणुकीत रेनापुर मतदार संघातून राज्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
1980 ला परळी मतदार संघातून आमदार म्हणून विजयी
1985 मध्ये महाराष्ट्र राज्य विधानसभा रेनापुर मतदार संघात पराभव
1985 मध्ये बीड लोकसभा मतदारसंघात पराभव पत्करावा लागला
1990 मध्ये रेनापुर मतदार संघातून विजयी 1995 मध्ये विधानसभा आमदार मतदारसंघातून विजयी 1999 विधानसभा रेनापुर मतदार संघातून विजयी 2004 विधानसभा रेनापुर मतदार संघातून विजयी
2009 ला बीड जिल्ह्याचे लोकसभेचे खासदार
2014 खासदार म्हणून लोकसभेत निवड
ओबीसी आरक्षणाचा फायदा व्हावा आणि त्या समाजाच्या विकासासाठी उपयोग व्हावा याच्यासाठी संसदेत त्यांनी अनेक वेळा प्रश्न मांडले. जातनिहाय जनगणना आणि रेणके आयोगामुळे ते ओबीसी आणि भटके मग त्यांचे खऱ्या अर्थाने जाणता राजा ठरले.
गोपीनाथ मुंडे यांचा कसा होता ओबीसी संघर्ष :
गोपीनाथ मुंडे यांनी अनेक गोष्टी मनावर घेऊन काम केले. ओबीसी समाजाला इतर मागासवर्गीय यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे आर्थिक प्रगती सुधारण्यासाठी त्यांचे प्रश्न सोडवण्याचे नितांत आवश्यकता आहे. मात्र राज्य सरकार ज्याप्रमाणे केंद्र सरकारही म्हणावे तेवढे लक्ष देत नाही, म्हणून केंद्र सरकारने एक स्वतंत्र खाते इतर मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी काम करणारे असावे अशी गोपीनाथ मुंडे यांनी मागणी केली होती. गोपीनाथ मुंडे यांनी सामाजिक समस्या नेत्यांनी सोडवल्या नाही तर कोण सोडणार असा देखील प्रश्न मांडला होता. इतर मागासवर्गीय यांच्या प्रश्नासाठी अगदी मनापासून लढा दिला. त्यांच्या प्रश्नासंदर्भात त्यांनी अविरतपणे संघर्ष चालूच ठेवला.
भारतातील एकूण लोकसंख्येच्या 54 टक्के भाग केवळ ओबीसींच्या लोकसंख्येचा आहे. म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त जनता ओबीसी आहे. त्यांची शैक्षणिक, आर्थिक प्रगती व्हावी हे त्यांचे ध्येय होतं. भारतात हिंदू, मुस्लिम, शिख, बौद्ध, ख्रिश्चन, पारशी, असे अनेक धर्माचे लोक राहतात. त्या धर्मांच्या लोकांमध्ये अनेक वर्षापासूनची त्यांची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, उन्नतीपासून ते वंचित आहेत. त्यांना प्रगत जातीच्या लोकांसारखे जीवन जगता यावे, अशा दृष्टिकोनातूनच मंडल आयोगाची निर्मिती करण्यात आली. ओबीसींच्या प्रगतीसाठी आणि सामाजिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे, असं स्पष्ट मत गोपीनाथराव मुंडे यांनी मांडलं होतं.
भारतात इंग्रज राजवटीच्या काळापासून जनगणनेला सुरुवात झाली. तेव्हापासून प्रत्येक दहा वर्षाला जनगणना केली जाते. दर दहा वर्षाला होणाऱ्या या जनगणनेला आता थोडी सुधारणा करायला आवश्यकता आहे. लोकसंख्येपैकी 54 टक्के लोकसंख्या ओबीसी आहे. त्यांच्या पोट जातीच्या उल्लेखांसह जनगणनेतही नोंद झाली पाहिजे. इतर मागासवर्गीयांमध्ये कोणाकोणाचा समावेश होता आणि यामध्ये कोणत्याच पोट जातीचे किती लोक आहेत हे कळले पाहिजे. मुंडे यांचा हा विचार जातीवाचक मुळीच नाही. आपला चेहरा कसा दिसतो हे आपण आरशात पाहतो, त्याचप्रमाणे इतर मागासवर्गीयांची परिस्थिती समजावून घेण्यासाठी जनतेने स्पष्ट नोंदी केल्या असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. भारतात वेगवेगळ्या जाती पैकी 340 जाती ओबीसींच्या आहेत. त्यातील बऱ्याच जातींना इतर मागासवर्गीय म्हणून मान्यता असल्याची प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था सरकारने केली पाहिजे.
कायदा काय आहे हे सिद्ध करण्यासाठी ओबीसी लोकांना कोर्टकचेऱ्या करण्याची वेळ येऊ नये, अमुक जातीतील अमुक पोटजात असलेल्या व्यक्तीला ओबीसी असल्याचे प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे, महिलांना आरक्षण मिळाले पाहिजे असा विषय फार वेळा त्यांनी सभागृहामध्ये मांडला. राजकारणात महिलांना संरक्षण दिले पाहिजे. सरकारी तसेच सार्वजनिक क्षेत्रात महिलांना सुद्धा आरक्षण दिले पाहिजे, असा प्रखर विचार गोपीनाथ मुंडे यांनी मांडला. तसेच लोकसभा किंवा विधानसभा मध्ये राखीव मतदार संघ असला पाहिजे. त्याचबरोबर ओबीसी महिलांचा देखील विचार करायला पाहिजे. गोपीनाथ मुंडे संघर्ष योद्धा म्हणून ओळखले जात होते. 26 मे 2014 रोजी त्यांनी केंद्रीय ग्रामविकास मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर काही दिवसातच बीडवाशी यांना भेटण्यासाठी निघालेले गोपीनाथ मुंडे यांचा 3 जून 2014 रोजी अपघातात निधन झाले.
हेही वाचा -