ETV Bharat / state

सत्ता द्या 6 महिन्यात शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करू- अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा शुक्रवारी परळी येथे आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभेला संबोधीत केले. आम्हाला सत्ता द्या 6 महिन्यात शेतकर्‍यांचा 7/12 कोरा करू, असा शब्द त्यांनी यावेळी बोलताना दिला आहे.

अजित पवार
author img

By

Published : Aug 24, 2019, 2:09 AM IST

Updated : Aug 24, 2019, 2:46 AM IST

बीड- आम्हाला सत्ता द्या 6 महिन्यात शेतकर्‍यांचा 7/12 कोरा करू, असा शब्द माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी परळी शहरात झालेल्या शिवस्वराज्य यात्रेच्या सभेत बोलताना दिला. यावेळी पवार यांनी धनंजय मुंडे यांचे तोंड भरुन कौतुक केले. धनंजय मुंडेंची राज्याला गरज आहे. त्यांना परळीत बांधून ठेवू नका, त्यांच्या विजयाची जबाबदारी तुम्ही घ्या, असे आवाहन अजित पवार यांनी यावेळी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा परळीत

राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा शुक्रवारी परळी येथे आली. यादरम्यान परळी शहरातून रॅली काढण्यात आली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे या सभेला हजर होते. तसेच माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके, आ. बाबाजाणी दुर्राणी, आ.सतिश चव्हाण, आ.विक्रम काळे, माजी आ. अमरसिंह पंडित, उषाताई दराडे, राजेंद्र जगताप, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख आदींसह पक्षाचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

येणारी निवडणूक आमच्या अस्तित्वाची- धनंजय मुंडे

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी परळी मतदारसंघातली जनता उभी राहणार आहे. जनता सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण पुढील वाटचाल करत आहोत. राज्याच्या राजकारणामध्ये परळी विधानसभा मतदारसंघाची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. त्यामुळे जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यावेळी केले.

धनंजय मुंडे जनतेच्या मनातील नायक- अमोल कोल्हे

मी अनेक मालिकेतील नायक असलो तरी सर्वसामान्य जनतेच्या मनातील नायक धनुभाऊ आहेत. परळीकरांनो तुम्ही भाग्यवान आहात. धनुभाऊ सारख्या वाघाला मत देताय. शिरूरमध्ये माझा विजय धनुभाऊमुळे झाला. त्या विजयाची परतफेड मी परळीत येवून करेल, असा शब्द खासदार अमोल कोल्हे यांनी दिला आहे. धनुभाऊंच्या मनातलं परळीकर नक्कीच समजून घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच गुर्मी आलेले सरकार उलथवून टाका, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या वेळी प्रदेशसरचिटणीस अमोल मिटकरी, महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांचेही भाषण झाले.

Intro:सत्ता द्या 6 महिन्यात शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करू- अजित पवार

बीड- धनंजय मुंडेंची राज्याला गरज आहे, त्याला परळीत बांधुन ठेवु नका, त्याच्या विजयाची जवाबदारी तुम्ही घ्या असे आवाहन करत सत्ता द्या 6 महिन्यात शेतकर्‍यांचा 7/12 कोरा करू असा शब्द माजी उपमुख्यमंत पवार यांनी आज परळी शहरात झालेल्या शिवस्वराज्य यात्रेच्या सभेत बोलताना दिला.

परळी येथे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा आली होती. यादरम्यान परळी शहरातून रॅली काढण्यात आली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे, या सभेला माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके, आ.बाबाजाणी दुर्राणी, आ.सतिश चव्हाण, आ.विक्रम काळे, माजी आ. अमरसिंह पंडित, उषाताई दराडे, राजेंद्र जगताप, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, आदींसह पक्षाचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

येणारी निवडणूक आमच्या अस्तित्वाची- धनंजय मुंडे

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी परळी मतदारसंघातली जनता उभी राहणार आहे. जनता सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण पुढील वाटचाल करत आहोत. राज्याच्या राजकारणामध्ये परळी विधानसभा मतदार संघाची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. त्यामुळे जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहावे असे, आवाहन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे केले.
धनंजय मुंडे जनतेच्या मनातील नायक- अमोल कोल्हे

मी अनेक मालिकेतील नायक असलो तरी, सर्वसामान्य जनतेच्या मनातील नायक धनुभाऊ आहेत. परळीकरांनो तुम्ही भाग्यवान आहात धनुभाऊ सारख्या वाघाला मत देताय, शिरूर मध्ये माझा विजय धनुभाऊ मुळे झाला, त्या विजयाची परतफेड मी परळीत येवुन करेल, असा शब्द खा.अमोल कोल्हे यांनी देवुन धनुभाऊंच्या मनातलं परळीकर नक्कीच समजवुन घेवुन त्यांना साथ देतील असा विश्वास व्यक्त करून गुर्मी आलेले सरकार उलथवुन टाका असे आवाहन केले.

या वेळी प्रदेशसरचिटणीस अमोल मिटकरी, महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांचे ही भाषण झाले.
Body:बConclusion:ब
Last Updated : Aug 24, 2019, 2:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.