बीड Ganja seized In Paragon : बीडच्या गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाण्यांतर्गत पोलिसांनी मोठी कारवाई केलीय. तालुका शिरूर येथील बोगस पारगावात एका शेतातून 27 लाख 27 हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाला गांजाची शेती होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्याअधारे पोलिसांनी शेतात छापा टाकून गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केलीय. संभाजी हरिभाऊ कराड (37) असं गांजा लावणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
शेतकऱ्याविरोधात गुन्हा दाखल : या कारवाईत डीवायएसपी नीरज राजगुरु, पोलीस उपअधीक्षक खाडे, पोलीस निरीक्षक एकशिंगे, पोलीस उपनिरीक्षक इंगळे, पोलीस उपनिरीक्षक तांदळे, राजेश पाटील, आनंद शिंदे यांच्या पथकांनं बोगस पारगाव येथील शेतात छापा टाकला. तेव्हा 27 लाख 27 एक हजार 700 रुपये किमतीचा 554 किलो गांजा पोलिसांना आढळून आला. या प्रकरणी शेतमालक संभाजी हरिभाऊ कराड (37) याला अटक करण्यात आली आहे. तसंच पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आष्टी तालुक्यात गांजाची शेती : यापूर्वी बीडच्या आष्टी तालुक्यात गांजाची लागवड होत, असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी धाड टाकून गांजा पकडला होता. या भागात कापूस तसेच जनावरांच्या चाऱ्यासाठी लावलेल्या गवतामध्ये गांजाची लागवड केली जात होती. तसेच शिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहा परिसरातही काही लोकांनी अशाच प्रकारे गांजाची लागवड केली होती. तशीच परत घटना या परिसरात घडली आहे.
- मिरचीच्या शेतामध्ये गांजाची लागवड : चिंचपूर येथे उन्हाळी मिरचीच्या शेतामध्ये गांजाच्या झाडाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी पंचासमक्ष कारवाई केल्यानं जिल्हाभरात खळबळ उडाली होती.
बीड जिल्ह्यात उन्हाळी पिकांत गांजाची लागवड : गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात गांजाची शेती करत असल्याच निदर्शनास येत आहे. याअगोदर आष्टी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा पकडण्यात आला. त्यानंतर काही दिवस उलटतात तोच पुन्हा एकदा गेवराई तालुक्यात सिरसदेवी येथे एका भुईमुगाच्या शेतामध्ये गांजा सापडल्याची घटना घडली होती. त्यानंतर फक्त पंधरा दिवसानंतर पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात मिरचीच्या शेतामध्ये गांजा सापडला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात गांजा लागवडीचे लोण चांगलेच पसरले आहे काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
हेही वाचा -
- International drug syndicate: एनसीबीची आंतरराष्ट्रीय 'ड्रग्ज सिंडिकेट'वर कारवाई; मोठ्या प्रमाणात एमडीएमए आणि गांजा जप्त
- Police Station Set On Fire : पोलिसांवर गांजा तस्करीचा आरोप, कारवाई न झाल्याने जमावाने पोलीस स्टेशनच पेटवले
- Suspicious Bag In Dadar : दादर फुलबाजारात संशयास्पद बॅग आढळल्याने पोलिसांची तारांबळ; बॅगेत आढळला गांजा