ETV Bharat / state

बीड जिल्ह्यात चौघांनी गळफास घेत संपवले जीवन - आकाश शिंदे अंभोरा आत्महत्या

एकाच दिवशी बीड, कडा व गेवराई येथे वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांनी गळफास घेवून आपले जीवन संपवले आहे. मृतांमध्ये सामाजिक कार्यकर्ता, विद्यार्थी आणि शेतकर्‍यांचा समावेश आहे. लखन बनसोडे (वय 25 रा.बाबुलतारा), आकाश शिंदे (वय 22), उद्धव आतकरे (वय 40 रा.निपाणी जवळका), अशोक वाकडे (वय 42) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

बीड जिल्ह्यात चौघांनी गळफास घेत संपवले जीवन
author img

By

Published : Sep 15, 2019, 11:16 PM IST

बीड - एकाच दिवशी बीड, कडा व गेवराई येथे वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांनी गळफास घेवून आपले जीवन संपवले आहे. मृतांमध्ये सामाजिक कार्यकर्ता, विद्यार्थी आणि शेतकर्‍यांचा समावेश आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

हेही वाचा - पारधी समाजातील 23 वर्षीय युवकाचा खून; कारण अस्पष्ट

आर्थिक अडचण आणि एकतर्फी प्रेमातून लखन बनसोडे (वय 25 रा.बाबुलतारा) या अविवाहित युवकाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. लखनने एका चिठ्ठीत ‘मी आर्थिक अडचण व एकतर्फी प्रेमातून आत्महत्या करत असून नातेवाईकांनी कोणास जबाबदार ठरवु नये’ असा मजकूर लिहलेला आहे. याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गेवराई तालुक्यातच कर्जबाजारीपणाला कंटाळून उद्धव आतकरे (वय 40 रा.निपाणी जवळका) या शेतकर्‍याने आत्महत्या केली आहे. रविवारी सकाळी राहत्या घराच्या बाजूला एका पोलला दोरीच्या सहाय्याने त्यांनी गळफास घेतला. आतकरे यांच्या पाश्चात पश्चात पत्नी, आई वडील, भाऊ, भावजय, मुले, मुलगी असा मोठा परिवार आहे.

हेही वाचा - केज पोलिसांनी सोळा वर्षापूर्वीच्या खुनाचा केला पर्दाफाश

आष्टी तालुक्यातील अंभोरा येथील रहिवासी असलेल्या आकाश शिंदे (वय 22) त्याच्या दोन मित्रांनी मिळून केलेली मारहाण जिव्हारी लागल्याने आपमान झाल्याच्या नैराश्यातून गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी आकाश शिंदे यांचे वडील दत्तु शिंदे यांच्या फिर्यादीवरून अंभोरा पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राम बोकडे (वय 59), शंकर ओव्हाळ (वय 33) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शंकर याला अटक करण्यात आली आहे. तर, राम बोकडे हा फरार आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल लोखंडे करत आहेत.

हेही वाचा - बी़डमध्ये मोबाईल चोरीला गेल्याच्या तणावातून तरुणाची आत्महत्या

दुसऱ्या एका घटनेत, अशोक वाकडे (वय 42) यांनी शहरातील शाहूनगर येथील घरात खिडकीला गळफास घेत आत्महत्या केली. अनेक वर्षांपासून अशोक हे शिवसेनेचे कार्यकर्ते होते. बीड शहरातील एक समाजसेवक आणि धडपडीच्या कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. अशोक यांच्या आतेमहत्येमागील मूळ कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे

Intro:सोबत मयत यांचे फोटो

उद्धव आतकरे व बीड येथील शिवसैनिक अशोक वाकडे यांचे फोटो पाठवत आहे
*******
बीड जिल्ह्यात चौघांनी गळफास घेत संपवले जीवन
बीड- दिवसेंदिवस आत्महत्याच्या घटनेमध्ये वाढ होत आहे. एकाच दिवशी बीड, कडा व गेवराई येथे वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांनी गळफास घेवून आपले जिवन संपविले आहे. आत्महत्या करणार्‍यांमध्ये सामाजिक कार्यकर्ता, विद्यार्थी व शेतकर्‍यांचा समावेश आहे. या घटनेने जिल्हा हादरला असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

गेवराई-एकतर्फी प्रेमातून युवकाची आत्महत्या
आर्थिक अडचण आणि एकतर्फी प्रेमातून लखन बाबासाहेब बनसोडे (वय 25 रा.बाबुलतारा ता. गेवराई) या अविवाहित युवकाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. लखन च्या बँगमध्ये एक चिठ्ठी आढळून आली. त्यामध्ये ‘मी आर्थिक अडचण व एकतर्फी प्रेमातून आत्महत्या करत असून नातेवाईकांनी कोणास जबाबदार ठरवु नये’ असा मजकूर लिहलेला आहे. माहिती गेवराई पोलिसांना मिळाल्यानंतर पोह.भारत व्हरकटे यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

गेवराई- कर्जबाजारीपणास कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या
कर्जबाजारीपणास कंटाळून उद्धव रामकिसन आतकरे (वय 40 रा.निपाणी जवळका ता.गेवराई) या शेतकर्‍याने आत्महत्या केली. रविवारी सकाळी राहत्या घराच्या बाजूला एका पोलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलीस ठाण्याचे पोह.किशोर इंगोले, दत्ता चव्हाण यांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी उपजिल्हारुग्णालयात मृतदेह पाठवला. या प्रकरणी आकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आतकरे यांच्या पाश्चात पश्चात पत्नी, आई वडील, भाऊ, भावजय, मुले, मुलगी असा मोठा परिवार आहे.

कडा- अपमान झाला म्हणून तरुणाची आत्महत्या-

दोन मित्रांनी मिळून केलेली मारहाण जिव्हारी लागली. आपला खुप मोठा आपमान झाला या नैराश्यातून एका तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. आकाश दत्तू शिंदे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील अंभोरा येथील रहिवासी असलेले राम महादेव बोकडे (वय 59), शंकर बापु ओव्हाळ (वय 33), आकाश दत्तु शिंदे (वय 22) हे तिघेही बीड नगर रोडवरील एका कंपनीत काम करत होते. शुक्रवारी तिघेही दुपारी बाहेर आले आणि एका बरडदरी या ठिकाणी येऊन आकाश शिंदे याला राम व शंकर यांनी काठीने मारहाण केली. केलेली मारहाण जिव्हारी लागली आणि आपला अपमान झाला म्हणून आकाशने शुक्रवारी दुपारी तीन ते शनिवारी सकाळी नऊ या दरम्यान अंभोरा येथील नदीच्या कडेला असलेल्या चिचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी आकाश शिंदे यांचे वडिल दत्तु अंबादास शिंदे यांच्या फिर्यादीवरून अंभोरा पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी शंकर बापु ओव्हाळ हा अटक असून राम महादेव बोकडे हा फरार आहे. या प्रकरणी पुढील तपास सपोनि.ज्ञानेश्वर कुकलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल लोखंडे करीत आहेत.

बीड- शिवसैनिक आशोक वाकडे यांची आत्महत्या-

मागील अनेक वर्षापासून सर्वसामान्यांच्या मदतीसाठी धावणार्‍या एका शिवसैनिकाने राहत्या घरामध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. अशोक वाकडे (वय 42) असे आत्महत्या केलेल्या शिवसैनिकाचे नाव आहे. सकाळी शाहूनगर येथील घरात खिडकीला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांनी आत्महत्या करण्याइतपत टोकाचे पाऊल का उचलले ? याचे कारण मात्र समजू शकले नाही. बीड शहरातील एक समाजसेवक आणि धडपडीच्या कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.