ETV Bharat / state

Beed Accident : कल्याण विशाखापट्टणम महामार्गावर भीषण अपघातात 4 ठार - आयशर टेम्पो आणि स्कॉर्पिओ गाडी समोरासमोर धडकल्या

कल्याण विशाखापट्टणम महामार्गावर भीषण अपघातात चार जण ठार झाले आहेत. या चार जाणांमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. बीडवरुन अहमदनगरला जाणारा टेम्पो तसेच अहमदनगरवरुन गेवराईकडे जाणाऱ्या स्कार्पिओ यांच्यामध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली.

Beed Accident
Beed Accident
author img

By

Published : Jun 28, 2023, 9:06 PM IST

बीड : कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. पाटोदा तालुक्यातील डोंगरकिनीजवळ आयशर टेम्पो आणि स्कॉर्पिओ गाडी समोरासमोर धडकली. यात चौघांचा जागीच मृत्यू झाला असून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील सर्वांची प्रकृती सध्या धोक्या बाहेर असल्याचे सांगण्यात आले.

मृत्यू झालेल्यांमध्ये महिलेचा समावेश : बीडवरुन अहमदनगरला जाणारा टेम्पो तसेच अहमदनगरवरुन गेवराईकडे जाणारी स्कार्पिओ यांच्यामध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात चार जाणांचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. मृत्यू झालेले सगळे जण गेवराई तालुक्यातील मारफळा गावचे रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातामुळे गेवराई तालुक्यातील मरफळा गावावर शोककळा पसरली. अपघातग्रस्तांच्या आसपास राहणाऱ्या लोकांनी त्यामुळे हळहळ व्यक्त केली.

दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक : स्कॉर्पिओ क्रमांक MH12 FK9010 आणि आयशर टेम्पो क्रमांक MH 21 BH3820 या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. त्यामध्ये 4 जण ठार झाले आहेत. सर्व मृत हे गेवराई तालुक्यातील मारफळा या गावचे रहिवासी आहे. मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धाव घेत तात्काळ मदत कार्य सुरु केले. या अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे अनेकांचा खोळंबा झाला.

इंडिकाची डिव्हायडरला धडक : तर दुसरी घटना सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे. धुळे शहराजवळ असलेल्या कोळवाडी नजीक ही घटना घडली. यात एका इंडिका गाडीने डिव्हायडरला धडक दिल्याने चार जण जखमी झाले आहेत. तर गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महामार्गावर सारखे अपघात होत असल्याने जनतेमधून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. भरधाव येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांना चाप बसवण्यासाठी वाहतूक विभागाने काहीतरी उपाय योजना कराव्यात अशी अपेक्षा लोकांची आहे.

हेही वाचा - Solapur Accident : चार वाहनांचा विचित्र भीषण अपघात, महिलेचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.