बीड - जामखेड-नगर रस्त्यावर जामखेड पासून दहा कि. मी. अंतरावरील पोखरी येथे (ता. आष्टी, जिल्हा, बीड) पहाटेच्या सुमारास ट्रक व इर्टीका कार यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. यात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन पुरुष, एक महिला व एका सात वर्षीय मुलाचा समावेश आहे. सर्व मृत सावरगाव पिरजादे(ता. मुखेड, जिल्हा नांदेड) येथील रहिवाशी आहेत.
बीड-नगर रोडवरील आष्टीजवळील पोखरी फाटा (ता. आष्टी, जिल्हा, बीड) या ठिकाणी रविवार सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ट्रक (एपी ३९ यू २४२७) व इर्टीका कार (जीजे-१५ सीडी ६०८१) यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. यात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे.
मृतांची नावे-
नागेश चमकुरे (ड्रायव्हर), योगेश चमकुरे, अनुजा चमकुरे (वय ७ वर्षे), अनिकेत चमकुरे