ETV Bharat / state

लोणी परिसरात पाच मोरांचा मृत्यू, मोरांच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट - bird flu in Beed district

बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यामधील लोणी शिवारात शुक्रवारी सकाळी पाच मोर मृतावस्थेत आढळून आले आहेत. सध्या बीड जिल्ह्यात काही गावांमध्ये बर्ड फ्लूची साथ सुरू आहे. या पार्श्वुभूमीवर लोणी येथील ग्रामस्थांनी तालुक्याच्या पशुसंवर्धन विभागाला मोरांच्या मृत्यूची घटना कळवली आहे.

लोणी परिसरात पाच मोरांचा मृत्यू
लोणी परिसरात पाच मोरांचा मृत्यू
author img

By

Published : Jan 22, 2021, 3:10 PM IST

बीड- बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यामधील लोणी शिवारात शुक्रवारी सकाळी पाच मोर मृतावस्थेत आढळून आले आहेत. सध्या बीड जिल्ह्यात काही गावांमध्ये बर्ड फ्लूची साथ सुरू आहे. त्यामुळे मागील पंधरवड्यामध्ये काही पक्षांचा बर्ड फ्लू मुळे मृत्यू देखील झालेला आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शुक्रवारी मृतावस्थेत आढळलेल्या मोरांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाला आहे का? अशी शंका निर्माण झाली असून, लोणी येथील ग्रामस्थांनी तालुक्याच्या पशुसंवर्धन विभागाला मोरांच्या मृत्यूची घटना कळवली आहे.

लोणी परिसरात पाच मोरांचा मृत्यू

पशुसंवर्धन विभागाने उपाययोजना कराव्यात

सध्या बीड जिल्ह्यातील काही गावांमध्ये बर्ड फ्लूमुळे अनेक पक्षी मरत आहेत. याबाबत जिल्हा प्रशासनाने काही गावे संसर्गग्रस्त म्हणून घोषित देखील केलेली आहे. शुक्रवारी सकाळी पुन्हा बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यामधील लोणी येथे एका डोंगराच्या पायथ्याशी 5 मोरांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. या प्रकाराबाबत तेथील ग्रामस्थांनी तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवलेले असून. त्या मोरांच्या मृत्यूचे कारण तपासण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून मोरांची तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यान लोणी शिवारात मोरांची संख्या बर्‍यापैकी आहे. त्यामुळे इतर मोरांना धोका होऊ नये, यासाठी पशुसंवर्धन विभागाने तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणीदेखील लोणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.