बीड - जिल्ह्यातील परळी तालुक्यातील लिंबोटा येथील तांडा परिसरात असलेल्या कडब्याला आग लागून जवळच असलेल्या तीन घरांना या आगीचा तडाखा बसला. यामध्ये काही संसारोपयोगी साहित्य जाळले आहे. तांडा परिसरातील नागरिकांनी आग विझवल्याने अनर्थ टळला. ही घटना शनिवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली.
परळी तालुक्यातील लिंबोट्याच्या तांडा येथील हनुमान मंदिरामागे असलेला हजारो कडब्याच्या पेंड्याची गंज होती. अचानक पेट घेतल्याने या आगीत हाजारों रुपयांचा कडबा जळाला असून आग इतकी मोठी होती की, जवळ असलेल्या तीन घरांना याचा फटका बसला. यात रंगनाथ रेवा जाधव, कोंडीबा रामा जाधव, रमेश साहेबराव चव्हाण, रामकिसन कोंडीबा जाधव,गोपीनाथ कोंडीबा जाधव यांची घरे जळाले आहेत.
फुलचंद कराड व प्रशांत कराड यांच्या टिमने वैद्यनाथ कारखाना,परळी नगरपालिका, थर्मलच्या अग्निशमन दलाच्या बंबे बोलवली तीन बंबातून पाणीचा मारा करून आग विझवली. सुदैवाने जीवित हानी टळली असून नुकसान भरपाईची मागणी होत आहे.