ETV Bharat / state

बीडच्या एलआयसी इमारतीला लागलेल्या आगीत सर्व कागदपत्रे जळून खाक

बीड शहरातील नगर रोड भागात एलआयसीचे दोन मजली मुख्य कार्यालय आहे. या कार्यालयाला लागलेल्या आगीत कागदपत्रे आणि इतर साहित्य जळून खाक झाले आहेत. ही आग कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

fire broke out in lic office beed
एलआयसी इमारत
author img

By

Published : Nov 9, 2020, 8:38 AM IST

बीड- शहरातील नगर रोडवरील एलआयसी विभागाच्या कार्यालयाला सोमवारी पहाटे साडेतीन वाजता आग लागल्याची घटना घडली. या आगीत कार्यालयातील सर्व कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. सुदैवाने जीवित हानी झालेली नसल्याचे एलआयसी शाखाधिकारी परदेशी यांनी सांगितले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीड शहरातील नगर रोड भागात एलआयसीचे दोन मजली मुख्य कार्यालय आहे. या कार्यालयाला लागलेल्या आगीत कागदपत्रे आणि इतर साहित्य जळून खाक झाले आहेत. ही आग कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे अग्निशमन विभागाचे प्रमुख रामप्रसाद राऊत यांनी सांगितले.

बीडच्या एलआयसी इमारतीला लागलेल्या आगीत सर्व कागदपत्रे जळून खाक
आग विझवण्याचे प्रयत्न सुरू -इमारतीतील आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागाचे जवान पहाटे साडेतीन वाजेपासून प्रयत्न करत आहेत. गेवराई येथील अग्निशमन विभागाच्या गाड्यांना आग विझवण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.