ETV Bharat / state

Beed Crime : एटीएममधून पैसे काढता येत नसल्याने कार्ड अनोळखीच्या हाती देणे पडले महागात, 97 हजारांचा गंडा

अंबाजोगाई एटीएमवर पैसे काढता येत नसल्याने, एटीएम कार्ड अनोळखीच्या हाती सोपविणे एका व्यक्तीस भलतेच अंगलट आले आहे. भामट्याने एटीएम कार्डची अदलाबदल करून तब्बल 97 हजारांना गंडा घातला. दिवाकर भगवान दळवे (वय 65 वर्षे, रा. मोरेवाडी, ता. अंबाजोगाई) असे फसवणूक झालेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे.

Beed Crime
97 हजारांचा गंडा
author img

By

Published : Jan 29, 2023, 10:17 PM IST

आर्थिक फसवणुकीबाबत बोलताना पोलीस अधिकारी

बीड : जिल्ह्यात ऑनलाइन फसवणूक केलेल्या 2 लाख 68 हजार रुपयांचा बीड सायबर पोलिसांनी त्याचा छडा लावून हे पैसे परत केले आहे. माजलगाव तालुक्यातील तालखेड येथील सुनिता प्रवीण जाधव, बीड शहरातील शाहूनगर भागातील लक्ष्मण गुलाबराव वंजारे, तर नरेश बाबुराव शिंदे (रा. चंपावती नगर बीड), चंद्रकांत जगन्नाथ नन्नवरे (रा. नेकनूर ता. बीड), आशुतोष बाळासाहेब घोडके (रा. बीड) या सर्वांची ऑनलाईन फसवणूक होऊन बँक खात्यातून परस्पर 2 लाख 68 हजार रुपये खात्यातून परस्पर चोरी गेल्याची तक्रार सायबर पोलिसांकडे दिली होती. तक्रारदारांनी सायबर पोलिसांना झालेला प्रकार सांगितला व आठ दिवसांत या प्रकरणाचा छडा लावला व ज्या व्यक्तींनी तक्रार दिली होती त्या सर्वांना बोलावून त्यांची रक्कम त्यांना मिळवून दिली.

सायबर पोलिसांचे आवाहन : सायबर पोलीस ठाणे बीड हे सर्व नागरिकांना असे आवाहन करत आहे की, कोणीही अनोळखी लोकांशी फोन एसएमएस सोशल मीडियावरून देवाणघेवाण पैशाचे व्यवहार करू नयेत. व्यापार करत असताना त्याची संपूर्ण खात्री करावी. हिंदी भाषिक लोकांचे येणारे कॉल हे फसवणाऱ्या लोकांचे असू शकतात किंवा कोड पाठवू नका. कोणतेही अनोळखी ॲप लिंक खात्री केल्याशिवाय डाउनलोड करू नका, असे आवाहन बीड पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी केले आहे.

काय म्हणतात अप्पर पोलीस अधीक्षक ? सर्व नागरिकांना असे आव्हान करेल की, ऑनलाइन जे ट्रांजेक्शन काळजीपूर्वक करावेत, कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून येणाऱ्या लिंक किंवा मेसेजेस, त्याच्यामध्ये त्या लिंक सबस्क्राईब करू नये. त्यामध्ये तुमची पर्सनल शेनसेटीव्ह इन्फॉर्मेशन असेल जसे की तुमचे पॅन कार्ड नंबर असेल आधार कार्ड नंबर असेल तुम्हाला येणाऱ्या बँकेच्या ट्रांजेक्शनची ओटीपी असेल ते कुणालाही अज्ञात व्यक्तींना शेअर करू नये, असे आवाहन सायबर पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

बनावटी नोटांची सुळसुळाट: माजलगाव शहरात शंभर, दोनशेच्या बनावट नोटा चलनात वापर होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बनावट नोटा चलनात आणणाऱ्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी लोकांकडून केली जात आहे. खरेदी-विक्री करताना व्यापाऱ्यांकडून प्रत्येक नोट पाहूनच घेतली जात असल्याने व्यापाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.

ग्राहकाला आला संशय: सिध्देश्वर गायकवाड यांना दोनशे रुपयांच्या नोटवर शंका आली. यासाठी त्यांनी त्या नोटांचे BAT 964022 निरीक्षण केले असता, त्यावर उजव्या बाजूला महात्मा गांधी यांचे पांढरे वॉटरमार्क नव्हते. नोटवर सेफ्टी लाइन ही जाड नसून फक्त हिरव्या रंगाची प्रिंटिंग होती.

बनावटी नोटांविरुद्ध कारवाई केव्हा? सोबतच दुसऱ्या दोनशेच्या नोटा व त्या नोटाच्या रंगातसुद्धा थोडा फरक दिसून आला. मागील तीन चार दिवसांपासून बाजारात खरेदी करत असल्याने ती नोट कुणी दिली असेल याची खात्री सिध्देश्वर यांना करता आली नाही. बँक आणि पोलीस प्रशासनांना कारवाई करणे गरजेचे आहे.

हेही वाचा: Mumbai Crime : सहाय्यक पोलीस निरीक्षकाने केली आत्महत्या; नैराश्यामुळे उचलले टोकाचे पाऊल?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.