ETV Bharat / state

पाऊस पडला, पण काळ्या आईची ओटी भरू कशी; दुष्काळात पिचलेल्या बीडच्या शेतकऱ्याचा सवाल - hinngani

तीन-चार वर्षांपासून बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतातील उत्पन्नच आलेले नाही. बहुतांश शेतकऱ्यांची मदार केवळ शेतीच्या उत्पन्नावरच आहे. अशा परिस्थितीत खरिपाच्या पेरणीसाठी पैसा आणायचा कोठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पाऊस पडला, पण काळ्या आईची ओटी भरू कशी; दुष्काळात पिचलेल्या बीडच्या शेतकऱ्याचा सवाल
author img

By

Published : Jun 9, 2019, 10:21 AM IST

Updated : Jun 27, 2019, 9:29 PM IST

बीड - तीन वर्षांपासून पावसाने फिरवलेली पाठ, शेतात जे काही पेरलं ते वाया गेलं, मोठ्या हिमतीने गेल्या वर्षी दीड एकर ऊस केला, वाटलं पोरांच्या शिक्षणाचा खर्च तरी भागेल. पण, ऊसाला ऐनवेळी पाणीच कमी पडलं ऊसाबरोबर माझ्या पोरांच्या शिक्षणाचं स्वप्नदेखील करपून गेलं. यंदा उसनवारी करून ६ एकर जमिनीची मशागत केली. एसबीआय बँकेकडे कर्जाची फाईल केली आहे. मात्र, ते पैसे मिळाले की उसनवारी करुन घेतलेले पैसे परत करावे लागणार. आता पाऊस पडला तरी, खरीपाची पेरणी कशी करू, असा प्रश्न बीड जिल्ह्यातील हिंगणी (खुर्द) येथील शेतकरी कालिदास तांदळे यांनी उपस्थित केला आहे. हा प्रश्न केवळ या एका शेतकऱ्याचा नाही. तर, जिल्ह्यातील दुष्काळात पिचलेल्या बहुतांश शेतकऱ्यांचा आहे. या परिस्थितीचा 'ईटीव्ही भारत' ने घेतलेला हा खास आढावा...

दुष्काळात पिचलेल्या बीडच्या शेतकऱ्यांची व्यथा

शेतकरी कालिदास तांदळे यांच्याकडे एकूण ६ एकर जमीन आहे. कुटुंबात आई-वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी, अशा सहा जणांचा समावेश आहे. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावरच त्यांचं कुटुंब अवलंबून आहे. शेतीला कुठलाच जोडधंदा नाही. शेतीतील उत्पन्नावरच मुलीच्या शिक्षणाची मदार असल्याचे शेतकरी कालिदास तांदळे सांगतात. यंदा मुलगी ७० टक्के गुण घेऊन बारावी पास झाली आहे. मुलीला डॉक्टर बनायचे आहे. मात्र, वडिलांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे मुलगी क्रांती हिने 'नीट' परीक्षा दिली नाही.

एका वर्षातच मोडावे लागले उसाचे खोडवे-

गेल्यावर्षी दीड एकर ऊस लावला. त्यासाठी ५० हजार रुपये खर्चदेखील केला. लावलेल्या उसाचे ३ वर्ष उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, पाण्या अभावी हे उसाचे खोडवे पहिल्याच वर्षी मोडावे लागले. ऊस लावलेली जमीन नीट करण्यासाठी २० हजाराचा खर्च झाला. उत्पन्न तर मिळालेच नाही, खर्च मात्र झाला. यामुळे मोठे नुकसान झाले. आता तो दीड एकर ऊस लावायला आणलेले लोकांचे पैसे द्यायचे कसे? यातच आता खरिपाची पेरणी तोंडावर आली. काळ्या आईची ओटी भरायची कशी? असे अनेक न सुटणारे प्रश्न आमच्या डोक्यात घोंघावतात, असे कालिदास यांनी सांगितले. वर्षभराचा घर खर्च भागविण्यासाठी एक दुभती गाय आणि दोन शेळ्या आहेत. दुध विकून मिळालेल्या पैशातून कसातरी खर्च भागवला जातो. या सगळ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी यंदा तरी चांगला पाऊस पडावा, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

पेरायचं काय याचं नियोजन झालंय, पण पेरणीसाठी पैशाचं अवघड आहे.

यंदा खरिपाच्या वेळेला शेतात काय पेरायचं याचे नियोजन झाले आहे. मात्र, पेरणीसाठी लागणाऱ्या पैशाची जुळवाजुळ करणे अवघड आहे, असे कालिदास यावेळी म्हणाले. यावर्षी सोयाबीन, कापूस, बाजरी तूर आणि तीळ ही खरिपाची पिके घेण्याचे नियोजन आहे. आता बँकेने कर्ज दिले की, काळया आईची ओटी भरणार( पेरणी करणार) असे त्यांनी सांगितले.

पंधरा दिवसांपासून बँकेकडे चकरा -

बँकेने पेरणीसाठी कर्ज द्यावे, अशी मागणी दुष्काळात पिचलेले शेतकरी करत आहेत. तीन-चार वर्षांपासून बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतातील उत्पन्नच आलेले नाही. बहुतांश शेतकऱ्यांची मदार केवळ शेतीच्या उत्पन्नावरच आहे. अशा परिस्थितीत खरिपाच्या पेरणीसाठी पैसा आणायचा कोठून? हा प्रश्न निर्माण झालेला आहे. कालिदास तांदळे हे शेतकरी खरिपाच्या पेरणीसाठी कर्ज मिळेल म्हणून मागील पंधरा दिवसापासून बँकेकडे चकरा मारत आहेत. बँका शेतकऱ्यांना कर्ज द्यायला धजवत नाही. आता बँकेने जर कर्ज दिले नाही, तर खरिपाची पेरणी मी करूच शकणार नाही, असे त्यांनी हताश होऊन शेवटी सांगितले.

Intro:मा. संपादक साहेब साठे सर यांनी दिलेल्या सुचने नुसार शेतकऱ्याला खरीप पेरणी व मुलांच्या शिक्षणाची चिंता असलेली बातमी व विजवल बाईट पाठवत आहे.

बाईट+व्हिज्युअल+p2c
कालिदास तांदळे ( शेतकरी)
सुनीता (शेतकरी पत्नी)
क्रांती ( शेतकरी मुलगी)
संकेत ( शेतकरी मुलगा)
****************************

पाऊस पडला तरी काळ्या आई ची ओटी भरू कशी; दुष्काळात पिचलेल्या शेतकऱ्याने उपस्थित केला प्रश्न

बीड- तीन वर्षांपासून पावसाने पाठ फिरवलेली, शेतात जे काही पेरलं ते वायाच गेलं, मोठया हिंमतीने गेल्या वर्षी दीड एकर ऊस केला, वाटलं पोरांच्या शिक्षणाचा खर्च यावर भागल मात्र सगळं विपरीत झालं. ऊसाला ऐनवेळी पाणीच कमी पडल्यामुळे उसाबरोबर माझ्या पोरांच्या शिक्षणाचं स्वप्न देखील करपून गेलं. मुलगी बारावीत 70 टक्के घेऊन पास झाली. मुलगा दहावीत आहे, पण या पोरांना शिकवू शकत नाही, हे त्यांना कसं सांगू? यंदा उसनवारी करून 6 एकर जमिनीची मशागत केली आहे. एसबीआय बँकेकडे कर्जाची फाईल केली आहे. कर्जाचे पैसे मिळाले की पाहुन्या रावळयांचे माशागतीला आणलेले उसने पैसे परत करावे लागणार. आता पाऊस पडला तरी खरीपाची पेरणी करू कशी? असा प्रश्न बीड तालुक्यातील हिंगणी (खुर्द) येथील शेतकरी कालिदास तांदळे यांनी उपस्थित केला आहे. हा प्रश्न केवळ कालिदास तांदळे या एका शेतकऱ्याची समस्या नाही तर बीड जिल्ह्यातील दुष्काळात पिचलेल्या बहुतांश शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. या परिस्थितीचा 'ईटीव्ही भारत' ने घेतलेला हा आढावा.....

Body:बीड तालुक्यातील उस्मानाबाद व बीड जिल्ह्याच्या सीमेवरती असलेल्या हिंगणी (खुर्द) येथील शेतकरी कालिदास तांदळे यांच्याकडे एकूण सहा एकर जमीन आहे. कुटुंबात आई-वडील, पत्नी व एक मुलगा , एक मुलगी असे सहा जणांचे हे तांदळे कुटुंब आहे. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नवरच अवलंबून, शेतीला कुठलाच जोडधंदा नाही. गेल्या वर्षीपासून गहू ज्वारी विकत आणून खातोत, शेतीतील उत्पन्नावरच मुलीच्या शिक्षणाची मदार असल्याचे शेतकरी कालिदास तांदळे सांगतात. यंदा मुलगी 70 टक्के गुण घेऊन बारावी पास झाली आहे. मुलीला डॉक्टर बनायचं पण वडिलांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे मुलगी क्रांती हिने 'नीट' परीक्षा दिली नाही.

एका वर्षात च मोडावे लागले उसाचे खोडवे-
गेल्यावर्षी दीड एकर ऊस लावला. त्यासाठी पन्नास हजार रुपये खर्च देखील केला. लावलेल्या उसाचे तीन वर्ष उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र पाण्या अभावी हे उसाचे खोडवे पहिल्याच वर्षी मोडावे लागले. ऊस लावलेली जमीन नीट करण्यासाठी 20 हजाराचा खर्च झाला. उत्पन्न तर मिळालेच नाही खर्च मात्र झाला. यामुळे मोठे नुकसान झाले. आता तो दीड एकर ऊस लावायला आणलेले लोकांचे पैसे द्यायचे कसे? यातच आता खरिपाची पेरणी तोंडावर आली. काळ्या आईची ओटी भरायची कशी? असे अनेक न सुटणारे प्रश्न आमच्या डोक्यात घोंघावतात असे कालिदास तांदळे यांनी सांगितले.
वर्ष भराचा घर खर्च भागविण्यासाठी एक दुभती गाय व दोन शेळ्या आहेत. दूध डेअरीवर घालून आलेल्या पैशातून कसेतरी घर खर्च भागवला जातो. दुष्काळा मुळे शेतीतून तर उत्पन्नच यायचेच बंद झाले आहे. या सगळ्या परिस्थितीवर मात करत वर्ष करायला आलं आता यंदा पाऊस पडला तर होईल बरं सगळे अशी आशा आजही या भागातील शेतकऱ्यांना आहे.

पेरायचं काय याचं नियोजन झालंय, पण पेरणीसाठी पैशाचं अवघड आहे.

यंदा खरिपाच्या वेळेला शेतात काय पेरायचं याचं नियोजन झालंय मात्र पेरणीसाठी लागणाऱ्या पैशाचं अवघड आहे असे सांगत कालिदास तांदळे म्हणाले की, यावर्षी सोयाबीन, कापूस, बाजरी तूर व तीळ ही खरिपाची पिके घेण्याचं नियोजन आहे. बस आता बँकेने कर्ज दिलं की, काळया आईची ओटी भरणार( पेरणी करणार) असे ते म्हणाले.

Conclusion: पंधरा दिवसापासून बँकेकडे चकरा-
बँकेने पेरणीसाठी कर्ज द्यावे अशी मागणी दुष्काळात पिचलेले शेतकरी करत आहेत. तीन-चार वर्षांपासून बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतातील उत्पन्नच आलेले नाही. बहुतांश शेतकऱ्यांची मदार केवळ शेतीच्या उत्पन्नावरच आहे. अशा परिस्थितीत खरिपाच्या पेरणीसाठी पैसा आणायचा कोठून? हा प्रश्न निर्माण झालेला आहे. कालिदास तांदळे हे शेतकरी खरिपाच्या पेरणीसाठी कर्ज मिळेल म्हणून मागील पंधरा दिवसापासून बँकेकडे चकरा मारत आहेत. बँका शेतकऱ्यांना कर्ज द्यायला धजवत नाही. आता बँकेने जर कर्ज दिले नाही तर खरिपाची पेरणी मी करूच शकत नाही. असे हताश शेतकरी कालिदास यांनी सांगितले.
Last Updated : Jun 27, 2019, 9:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.