बीड : जिल्ह्यातून शेतकऱ्याने कांद्याला भाव नसल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड तालुक्यातील बोरखेड येथील संभाजी अर्जुन अष्टेकर वय २३ वर्षीय शेतकरी रात्री शेतात पाणी देण्यासाठी गेला आणि तो घरी परतलाच नाही. दरम्यान, सकाळी शेतात आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या परिस्थितीत या शेतकऱ्याचा मृतदेह आढळला. घरातील संपुर्ण कुटुंबाची जबाबदारी एकट्यावरच असल्याने अर्थिक अडचणीचा सामना करावा लागत होता.
कांद्याला भाव नसल्यामुळे आत्महत्या : या शेतकऱ्याने ५ एकर जमिनीपैकी ३ एकर जमिनीत कांदा लावला होता. दरम्यान, कांद्याला भाव नसल्यामुळे संभाजी चिंतेत असल्याचे त्याचे वडील अर्जुन अष्टेकर यांनी सांगितले. जवळपास साडे ३ लाख रूपये कर्ज असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिस प्रशासनाने घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. महसूल विभागाचे तलाठी यांनी घटनास्थळी भेट दिली. लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. संभाजी कुटुंबातील एकमेव कर्ता पुरुष असल्यामुळे वयोवृद्ध वडील अर्जुन लक्ष्मण अष्टेकर (वय ६५) वर्षे आई वनमाला (वय ६०) वर्षें,मोठा भाऊ शिवाजी हा भोळसर (वय ३०) वर्षं मोठी बहीण सोनाली अंबादास वनकुदरे मुलगा मंदार वय ९ वर्षे भोळसर असुन, मुलगी ऋतुजा वय ७ वर्षे या सर्वांची जबाबदारी त्याच्यावर होती.
शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांमध्ये तब्बल 50 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे भीषण वास्तव सरकारी आकडेवारीनुसार समोर येत आहे. आता या सरकारला नेमके शेती उत्पादनाला भावना दिल्यामुळे शेतकरी टोकाचे पाऊल उचलत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्याचबरोबर बँकांकडून घेतलेली कर्ज कसे फेडावेत याच विवंचनेतून बीड जिल्ह्यात जवळपास 50 आत्महत्या झाल्या आहेत. मागील वर्षी 2022 मध्ये तब्बल 270 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे भीषण वास्तव ईटीव्ही भारतने दाखवले होते. अलीकडेच कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते
हेही वाचा : Solapur Crime: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने केली आत्महत्या