ETV Bharat / state

Farmer Suicide : अतिवृष्टीग्रस्त तरुण शेतकऱ्याने घेतला गळफास; कुटुंब उघड्यावर - परतीच्या पावसाने मोठे नुकासान

सोयाबीन अतवृष्टीमुळे खराब ( Soybeans damaged by heavy rains ) झाल्याने बीडमधील तरुण शेतकऱ्याने आत्महत्या ( Farmer suicide Beed )केली आहे. गणेश मारूती सारूक ( वय ३१ ) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

Farmer Suicide
Farmer Suicide
author img

By

Published : Oct 25, 2022, 9:54 PM IST

बीड - केज तालुक्यातील जोला या गावातील तरूण शेतकऱ्यांने आत्महत्या ( Farmer suicide ) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गणेश मारूती सारूक ( वय ३१ ) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सारूक यांचे परतीच्या पावसाने मोठे नुकासान ( Heavy damage due to return rains ) झाले होते. त्यांची २ एक्कर सोयाबीन अतवृष्टीमुळे खराब ( Soybeans damaged by heavy rains ) झाल्याने त्यांत्यावर आर्थिक संकट निर्माण झाले होते. त्यांच्यावर सेवा सहकारी सोसायटीसह इतर खाजगी कर्जाचा मोठा डोंगर त्यांच्यावर होता.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास - कर्जबाजारीपणाला कंटाळून या शेतकऱ्याने आज स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर परिवाराला घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मोठा हंबरडा फोडला.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेनंतर दगडाचं काळीज असलेल्या प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधींकडून या घटनेची गांभीर्याने दखल घेतली जाणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर, सरकार परिवाराला मदत करणार की वाऱ्यावर सोडाणार ? हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.