बीड - गेवराई तालुक्यातील आगर नांदूर येथील एका शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली आहे. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी कर्जबाजारीपणा व नापिकी यातून आलेल्या नैराश्यामुळे जीवन संपवत असल्याची फेसबुकवर पोस्ट टाकली होती.
काशीनाथ त्रिंबक आरेकर(38), असे मृताचे नाव आहे. सोमवारी त्यांनी ‘फेसबुकवर मी काशिनाथ त्रिंबक आरेकर नातेवाईकांना व मित्रमंडळीना शेवटचं’ अशी पोस्ट टाकली. नापिकी व कर्जबाजारीपणामुळे घराच्या जवळच असणार्या लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. काशीनाथ आरेकर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली व आई असा परिवार आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, संबधित शेतकर्यावर राष्ट्रीयकृत व खासगी बँकेचे कर्ज होते. कर्जाचा डोंगर वाढत असल्याने व कर्ज फेडणे मुश्कील झाल्याने आरेकर यांनी टोकाचे पाऊल उचलले, असे नातेवाईकांकडून सांगण्यात आले आहे.
धक्कादायक! फेसबुकवर कैफियत मांडत तरुण शेतकर्याने घेतला गळफास - शेतकरी आत्महत्या गेवराई
बीडच्या गेवराईत एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर पोस्ट टाकल्याची माहिती समोर आली आहे.