बीड - बीडमधील शिवसेनेचे नेते जयदत्त क्षीरसागर ( Jayadatt Kshirsagar ) हे भाजपामध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा सुरू ( Jaydutt Kshirsagar joins BJP ) होत्या. मात्र, क्षीरसागर यांनी ठाकरे गट सोडणार असल्याचे कोणतेही माहिती दिली नव्हती. या पार्श्वभूमीवर आज बीडमधील ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल जगताप ( Anil Jagtap, district president of the Thackeray group in Beed ) यांनी पत्रकार परिषद घेऊन क्षीरसागर यांचा शिवसेनेशी कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यांमुळे क्षीरसागर यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्याची सुत्रांची माहिती आहे.
भाजपात जाणार असल्याच्या चर्चेला उधान- शिंदे सरकारच्या घडामोडीबाबत जयदत्त क्षीरसागर यांनी कोणतीच भूमिका स्पष्ट केली नव्हती. त्यामुळे ते भाजपात जाणार असल्याच्या चर्चेला उधान आले होते. तसेच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटाचा कोणताही प्रोटोकॉल पाळलेला नव्हता. त्यामुळे त्यांना आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी सांगितलं होतं.
दरम्यान, क्षीरसागर यांनी मधल्या काळात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाविषयी अनेकदा उघडपणे नाराजी बोलून दाखवली होती. शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर क्षीरसागरही त्यांच्यासोबत जातील असा अंदाज वर्तवला जात होता.