ETV Bharat / state

बीड शहरातील अतिक्रमणावर नगरपालिकेचा हातोडा; रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास - beed municipality news

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील अतिक्रमण बीड नगरपालिकेने मंगळवारी हटवले. मागील अनेक महिन्यांपासून मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले होते.

encroachment
बीड शहरातील अतिक्रमण नगरपालिकेने काढले
author img

By

Published : Mar 9, 2021, 7:50 PM IST

बीड - शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील अतिक्रमण बीड नगरपालिकेने मंगळवारी हटवले. मागील अनेक महिन्यांपासून मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले होते. परिणामी पादचाऱ्यांना रस्त्याने चालताना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत होता. अखेर नगरपालिकेने मुख्य रस्त्यावरची छोटी-छोटी दुकाने व हातगाडे हटवल्या मुळे शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले.

बीड शहरातील अतिक्रमण नगरपालिकेने काढले

हेही वाचा - फडणवीस सरकारमुळेच मराठा आरक्षण कायद्याच्या कचाट्यात - अशोक चव्हाण

मुख्य मार्गावर मागील अनेक महिन्यापासून वाढते अतिक्रमण हटविण्याच्या संदर्भाने नागरिकांमधून मागणी होत होती. अखेर मंगळवारी बीड नगरपालिकेने बीड शहरातील अतिक्रमण हटविण्या संदर्भात पुढाकार घेतला व शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, बार्शी रोड तसेच बीड नगरपालिका परिसरातील अतिक्रमण हटवले आहे. पालिकेने केलेला या कारवाई संदर्भात बीडकरांनी समाधान व्यक्त केले असून शहरातील इतर मार्गावरील अतिक्रमण देखील तात्काळ हटवावे अशी मागणी नागरिक करत आहेत.

पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी पथक आवश्यक-

यापूर्वी देखील बीड नगरपालिकेने अनेक वेळा बीड शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली आहेत. मात्र अतिक्रमण हटवल्यानंतर पुन्हा आठ-दहा दिवसात अतिक्रमणे पुन्हा होतात. असा प्रकार पुन्हा-पुन्हा होऊ नये, यासाठी बीड नगरपालिकेने विशेष पथकाची नियुक्ती करून अतिक्रमण करणाऱ्यावर नजर ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा पुन्हा हटवलेले अतिक्रमण ' जैसे थे ' च होते. याकडे बीड नगरपालिकेने विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी देखील नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा - कोरोनाच्या काळात गर्दी टाळण्याकरता नाशकात शनिवारसह रविवारी टाळेबंदी जाहीर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.