बीड- कोरोना विषाणूचे संकट मानवावर आले असले तरी याचा फटका जनावरांनादेखील बसत आहे. बीड शहरात फिरणारी मोकाट जनावरे आणि कुत्रे यांचीदेखील उपासमारी होत आहे. लॉकडाऊनमुळे कोणीच व्यक्ती घराबाहेर निघत नाही. रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. बाजारात शांतता पसरली आहे. त्यामुळे, रस्त्यावर फिरणारी मोकाट जनावरे आणि कुत्रेदेखील संकटात सापडले आहेत.
रस्त्यावर कोणी नसल्यामुळे या मोकाट जनावरांची तसेच कुत्र्यांची खाण्याची सोय होत नसल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे. शहरी भागात रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. यामुळे भटकणाऱ्या जनावरांवर उपासमारीची वेळ आली आहे. इतरवेळी रस्त्याच्या दुतर्फा वडापावचे गाडे, छोटे मोठे हॉटेल सुरू असतात. यामुळे, या भटक्या जनावरांची खाण्या-पिण्याची व्यवस्था व्हायची. मात्र, या लॉकडाऊनच्या काळात त्यांची उपासमार सुरू आहे. कोरोनासारख्या भयंकर महामारीचे संकट मानवजातीवर आले असले तरी त्याचा थेट परिणाम मुक्या जनावरांवरदेखील झाला आहे