बीड : वैद्यानाथ बँकेकडे उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील शंभूमाहादेव कारखाना चालविण्यासाठी काही रक्कम वैद्यनाथ बँकेकडून काही दिवसापूर्वी घेतली होती. त्यानंतर या कारखान्याने वैजनाथ बँकेची रक्कम काही प्रमाणात परत केली. नंतर त्याचे रक्कम परतच केली नाही. कारखान्याने वेळेत कर्ज परत न केल्याने कारखाना लिलावात काढण्यात आला. मात्र, या लिलाव प्रक्रियेत अटी आणि शर्तींचे उल्लंघन करण्यात आल्याची तक्रार वैद्यनाथ अर्बन को-ऑप बँकेचे सभासद सुभाष कारभारी निर्मळ यांनी गैरव्यवहराची चौकशी करून गुन्हा नोंदवावा, अशी मागणी केली होती.
चौकशीचे दिले आदेश : सभासद सुभाष कारभारी निर्मळ यांनी बीड पोलिस अधीक्षक कार्यालयात 5 जानेवारी 2023 रोजी अर्ज देऊन गैरव्यवहराची चौकशी करून गुन्हा नोंदवावा, अशी मागणी केली होती. या तक्रार अर्जावरून पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर बीड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीसीनंतर बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेने बजावली नोटीस : ज्यावेळेस हा कारखाना लिलावात काढला त्यावेळेस वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव बँकेला विचारातही घेतले असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच बँकेने जे नियम कारखान्याला घालून गेले होते. त्या नियमांचे पालन शंभू महादेव सहकारी साखर कारखान्याने केले नाही. त्यामुळे बँकेची असणारी थकबाकी रक्कम कारखान्याने वेळेत परत केली नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये अफरातफर झाल्याची ही माहिती मिळत आहे. त्यामुळे वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड मुख्य शाखा परळी यांना आर्थिक गुन्हे शाखेने नोटीस बजावली आहे.
नोटीस बजावली : आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी उपअधिक्षक संतोष वाळके यांनी सहायक निरीक्षक सुजित बडे यांच्याकडे चौकशी सोपविली आहे. त्यानुसार चौकशीचा भाग म्हणून, अर्जातील आरोपाच्या अनुषंगाने म्हणणे सादर करण्यासाठी वैद्यनाथ बँकेचे चेअरमन विनोद सामत व मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद खर्चे यांना सहायक निरीक्षक बडे यांनी नोटीस बजावली आहे. तसेच 31 जानेवारी रोजी समक्ष हजर होऊन कागदपत्रांसह खुलासा करावा, असे नोटीसमध्ये नमूद केले आहे. सुभाष कारभारी निर्मळ यांनी पोलिसात केलेल्या तक्रारीवरून, संपूर्ण रक्कम जमा होण्यापूर्वी कारखान्याचा ताबा दिला. शिवाय तात्काळ बेकायदेशीररीत्या कर्ज वितरण केले. वैद्यनाथ बँकेची 65 कोटी व इतर बोजा 41 कोटी अशी एकूण 106 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केली, असा सुभाष निर्मळ यांचा आरोप आहे.
हेही वाचा : Pankaja Munde Party Change पंकजा मुंडेंनी केला पक्षप्रवेशाबाबत मोठा खुलासा म्हणाल्या