बीड - शहराजवळील मांजरसुंबा घाटात कंटेनरचा अपघात झाला आहे. कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला, त्यामुळे हा कंटेनर रस्त्यावर पलटी झाला. या अपघातात कंटेनरखाली सापडून चालक जागीच ठार झाला आहे. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली.
हेही वाचा... नांदेड : शिक्षकाकडून अश्लील चित्रफीत दाखून तिसरीतील चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
संतराम खुशीराम मुंगापुरवा (३८ रा. शाहबुद्दीनपूर, हरदोई, उत्तरप्रदेश) असे मृत चालकाचे नाव आहे. दुचाकी वाहने घेऊन जाणारा हा कंटेनर (क्र. एपी डब्ल्यू - १६३८) सोलापूरहून औरंगाबादकडे जात होता. मांजरसुंबा घाट उतरत असताना कंटेनरेचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कंटेनर रस्त्याच्या मधोमध आडवा झाला.
हेही वाचा... काँग्रेस नेत्याने स्वतःच्या मुलावरच झाडली गोळी, संपत्तीच्या वादातून घडला प्रकार
कंटेनरखाली दबल्याने चालक संतराम मुंगापुरवा याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे रस्त्यावरील वाहतुक काहीकाळ विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रमुख सुजित बडे यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.